शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात शिवपुतळ्यासाठी तीन कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

जयसिंगपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा भूसंपादन करण्याबरोबरच म्युझियम बांधणे व पुतळा उभा करण्यासाठी तीन कोटी दहा ...

जयसिंगपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जागा भूसंपादन करण्याबरोबरच म्युझियम बांधणे व पुतळा उभा करण्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपयांची तरतूद जयसिंगपूर पालिकेच्या अर्थसंकल्प सभेत करण्यात आली. पालिकेच्या या निर्णयामुळे शिवपुतळा उभारण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी १८ कोटींचा प्रकल्प व नगरपालिकेची नवीन इमारत बांधण्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली.

जयसिंगपूर पालिकेची सोमवारी सन २०२०-२१ च्या सुधारित व २०२१-२२ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकास मंजुरी देणे या विषयावर ऑनलाईन विशेष सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. नीता माने होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी टिना गवळी, लेखापरीक्षक राजेश पोवार, लेखापाल राजेंद्र महिंदरकर, नगरसेवक व विभागप्रमुख उपस्थित होते.

अंदाजपत्रकात आस्थापना खर्च, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, आर्थिक दुर्बल घटक, वृक्ष लागवडीकरण, कचरा संकलन व प्रक्रिया, औषध फवारणी व स्वच्छता खर्च यावर तरतूद करण्यात आली असून, उत्पन्न व खर्च याबाबत सविस्तर माहिती सभेत देण्यात आली. महसूल करातून सहा कोटी ४१ लाख रुपयांचा कर, तर भांडवली जमा ३३ कोटी २८ लाख ५० हजार रुपये असे उत्पन्न अपेक्षित आहे.

-------------------------

चौकट -

अर्थसंकल्पात यावर तरतुदी

येत्या आर्थिक वर्षात शहराला २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प उभारणे, नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी जमीन भूसंपादन, म्युझियम बांधणे व पुतळा उभारण्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

-------------------------------

चौकट -

पालिकेचा १३३ कोटींचा अर्थसंकल्प

कोणतीही करवाढ न करता जयसिंगपूर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन २०२०-२१ च्या २९ कोटी ४८ लाख रुपये शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. सभेत सन २०२१-२२ च्या एकूण १३३ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. नगरपरिषद शिक्षण मंडळासाठी ८७ लाख रुपयांची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

फोटो - छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरावे.