शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘आरडीसी’साठी शासकीय जागा द्यावी

By admin | Updated: December 16, 2014 00:49 IST

‘बिल्डो २०१४’चा समारोप : असोसिएशन आॅॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सची मागणी

कोल्हापूर : संशोधन विकास केंद्रासाठी ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर’ला शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्यावतीने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे करण्यात आली़ असोसिएशनच्या वतीने शनिवार (दि. १३)पासून  येथील मेरी वेदर ग्राउंडवर सुरू असलेल्या ‘बिल्डो २०१४’चा समारोप आज, सोमवारी झाला़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतेज पाटील उपस्थित होते़ अध्यक्षस्थानी विभागीय वनअधिकारी दादासाहेब शेंडगे होते़ सतेज पाटील म्हणाले, आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सला संशोधन विकास प्रकल्पासाठी शासकीय जागा मिळवून देण्यासाठी शासकीय स्तरावर सहकार्य करण्यास मी कटिबद्ध आहे़ असोसिएशनने आधुनिक काळात ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचा विचार करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा़ कोल्हापूर शहरात गुंतवणूक म्हणून गृहक्षेत्राकडे पाहण्याचा नागरिकांचा कल वाढलेला आहे़ त्यामुळे इजिनिअरिंग आणि आर्किटेक्टस् क्षेत्रातील देशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथील विद्यार्थी, तसेच व्यावसायिकांसाठी उपलब्ध करून द्यावे़ अध्यक्षीय भाषणात दादासाहेब शेंडगे म्हणाले, शहरातील लोकांना बांधकामासंबंधीच्या विविध सोयी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘बिल्डो - २०१४’ ने केले आहे़ या प्रदर्शनातील निसर्ग आणि पर्यावरणपूरक रचना धकाधकीच्या जीवनात उपयुक्त आहे़ असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे यांनी विविध शहरातील लोकांना बांधकामासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व सेवांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा ‘बिल्डो’ प्रदर्शनाचा हेतू आहे, असे सांगितले़ यावेळी अभिजित जाधव, सुधीर राऊत, मधुकर पोवार, दादासाहेब शेंडगे, संदीप घाटगे, मिलिंद नाईक, शिवाजी पाटील, रवी पाटील उपस्थित होते़ मिलिंद नाईक यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)