शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा

By admin | Updated: April 15, 2015 23:55 IST

शिवसेनेची मागणी : मुरगूड-वाघापूर पूलप्रश्नी आंदोलनाचा इशारा, बुधवारी वरिष्ठ अधिकारी देणार भेट

मुरगूड : कागल आणि भुदरगड तालुक्यांना जोडणाऱ्या वेदगंगा नदीवरील मुरगूड-वाघापूर पूल हा शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमिनी न देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शेतकऱ्यांना जमिनीबाबत प्रशासनाने विश्वासात घेतले नसल्याने नापसंती व्यक्त होत आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य मोबदला द्यावा, अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन करेल, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे.अनेक वर्षांपासून या पुलाची मागणी शेतकऱ्यांतूनच होती. युद्धपातळीवर या पुलाची उभारणी झाली. पूर्णपणे पूल तयार झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा पुलावर जाऊन बांधकाम बंद पाडले होते. यासंदर्भात जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. टी. पोवार यांना भेटून प्रकल्पग्रस्त लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला होता. दरम्यान, २२ एप्रिलला वरिष्ठ अधिकारी मुरगूड येथे येऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत.यावेळी संभाजीराव भोकरे, अशोक पाटील, हरीश यादव, शरद पाटील, वैभव मोरे, नितीन कांबळे, मयूर कांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)