शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

‘प्रोटोकॉल’ सुरक्षेचा की नेत्यांच्या अपमानाचा?

By admin | Updated: October 26, 2015 00:22 IST

उजळाईवाडी विमानतळ : नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान वाद नित्याचेच; ठोस धोरण ठरविणे गरजेचे

कोल्हापूर : उजळाईवाडी विमानतळावर प्रवेश देताना पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणांवरून राजकीय नेत्यांना मिळणारी वागणूक खूपच वादग्रस्त ठरत असून त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनाही मोठ्या अपमानास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विमानतळावर नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान वादावादीचे प्रसंग नित्याचेच बनले आहेत. त्यात पोलीस अधिकारी अनेक नेत्यांना ओळखतच नसल्याने त्याचाही फटका या नेत्यांना बसत आहे. रविवारी महापालिका निवडणुकीचा सुपर संडे असल्याने कोल्हापुरात जाहीर प्रचार सभांसाठी अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. या नेत्यांच्या स्वागतास विमानतळावर दिवसभर गर्दी होती. सकाळी पावणेदहा वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या स्वागतासाठी विमानतळावर कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यामध्ये कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.सुरुवातीला सर्वच नेते विमानतळ इमारतीच्या मुख्य दरवाजासमोर उभे होते. मात्र, विमानाचे ‘लॅँडिंग’ झाल्यावर सर्वप्रथम महादेवराव महाडिक आत गेले. त्यांना दबकतच अडविण्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी कोण अडविणार? असा प्रश्न करताच पोलीस यंत्रणा हबकली. त्यांच्यापाठोपाठ अनेक नेतेमंडळी आत जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने गोंधळ उडाला. विमानतळात प्रवेश करताना अनेक दिग्गज नेत्यांना पोलिसांकडून ढकलण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील पडता पडता वाचले. त्यामुळे त्यांनी आत न जाताच लांबच राहणे पसंत केले. शेवटी महाडिकांनी त्यांना बाहेर येऊन पुन्हा आत नेले. पोलिसांकडून दिग्गज नेत्यांना होणारी अशी वागणूक पाहून जि. प.चे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह अनेक नेत्यांनी बाहेरच राहणे पसंत केले. दरम्यान, महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी दारात उभे राहून आपल्या निवडक कार्यकर्त्यांची नावे पुकारत त्यांना आत घेतले. हा गोंधळ सुरू असतानाच सकाळी साडेआठ वाजल्यापासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या स्वागतास उपस्थित असलेल्या उजळाईवाडीच्या सरपंच कॉँग्रेसच्या कार्यकर्त्या स्मिता आंबवडे यांनी आत जाण्याची विनंती केली असता पोलीस अधिकारी दिलीप जाधव यांनी त्यांना बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी तसेच कार्यकर्त्यांनी जाधव यांना त्या या परिसरातील प्रथम नागरिक असल्याचे सांगून समजाविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी आम्ही शासनाचा पगार घेतोय, कोणाला आत सोडायचे तुम्ही आम्हाला शिकविण्याची गरज नाही, अशी उद्धट भाषा वापरली. त्यामुळे आंबवडे या घरी परत जाण्यास निघाल्या असता पुन्हा जाधव यांनी त्यांना बोलवून घेऊन आत नेले. या साऱ्या प्रकारांमुळे विमानतळाची सुरक्षा व्यवस्था व लोकप्रतिनिधींना दिली जाणारी वागणूक हा मुद्दा ऐरणीवर आला. विमानतळाची सुरक्षा महत्त्वाचीच आहे. यामध्ये कोणाचेच दुमत नाही, पण लोकप्रतिनिधींचे तसेच मान्यवरांचा सन्मान राखणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे भान राखणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त झाली. हे करता येईल?मंत्र्यांचे दौरे हे पूर्वनियोजित असल्याने त्यांच्या स्वागतास येणाऱ्या स्थानिक नेत्यांची व मान्यवरांची यादी अगोदरच नोंदवून घेता येईल.स्थानिक नेत्यांना व मान्यवरांना ओळखणारा एखादा पोलीस अधिकारी या ठिकाणी असणे आवश्यक आहे.विमानतळात प्रवेशासाठी एकच धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. एक तर कोणालाच प्रवेश देऊ नये किंवा देणे अपरिहार्यच असल्यास अगोदरच मान्यवरांना पूर्ण तपासणी करून आत प्रवेश द्यावा.पोलीस अधिकाऱ्यांनीही अडवणूक करताना किंवा बोलताना सौजन्याचे भान ठेवूनच वागणूक देणे गरजेचे आहे.नेत्यांनीही विमानतळाच्या सुरक्षेस बाधा येईल व अधिकाऱ्यांना प्रोटोकॉल सांभाळण्यात अडचण येईल असे वर्तन करु नये.