शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणारे आंदोलक एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे आंदोलक अद्याप फरार ...

कुरुंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे आंदोलक अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणारे आंदोलक एकाकी पडले असून, नेत्यांनीही पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी पंचगंगा काठावरील कार्यकर्ते जागरूकपणे वारंवार आंदोलन करत असल्याने पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता काहीअंशी कमी होते. नदीकाठच्या लाखो नागरिकांच्या जीवन - मरणाचा प्रश्न असताना या प्रश्नाकडे राजकीय नेते सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.

गत आठवड्यात नदीपात्रात काळेकुट्ट रसायनयुक्त सांडपाणी आल्याने मासे मृत्युमुखी पडले होते. त्याची पाहणी करून पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड तेरवाड बंधाऱ्यावर आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे यांच्यासह पाचजणांनी क्षेत्र अधिकारी हरबड यांना काही काळ बांधून घालून त्यांच्या कारभाराचा निषेध केला होता.

त्यामुळे अधिकारी हरबड यांनी आंदोलकांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या सार्वजनिक प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांकडे नेते, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पाठ फिरविल्याने आंदोलक एकाकी पडले आहेत. किमान राजकीय नेत्यांनी आंदोलकांना पाठबळ देण्याची गरज आहे. अन्यथा कोणत्याही प्रश्नावरील आंदोलन आंदोलकांविना पोरके होईल.