जयसिंगपूर : भारतात सरकारने गरिबांना अन्नसुरक्षा लागू केली आहे. उपासमारीकडे पाहिल्यास ही काळाची गरज बनली आहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याचे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. दिल्लीस्थित अमेरिकन दुतावासास सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.नुकतेच देशातील खासदारांचे शिष्टमंडळ अमेरिकन सरकारच्या आमंत्रणावरून अमेरिकेच्या भेटीला गेले होते. त्यानंतर दिल्लीस्थित अमेरिकन दुतावासातील राजदूत श्रीमती कॅथरिने स्टेपन्स व शेती विभागाचे सदस्य अलान मस्टर्ड यांनी सस्नेह भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी देशातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.खा. शेट्टी म्हणाले, देशातील १३० कोटी जनतेचे पोट भरण्याचे काम शेतकरीवर्ग करतो आहे. देशात जवळपास २७ टक्के लोक उपाशीपोटी राहतात. त्यांच्या सुरक्षेसाठी अन्नसुरक्षा लागू केली आहे. गरिबांच्या दृष्टीने हे चांगले असले तरीही १३० कोटी लोकांचे पोट भरणारा शेतकरी आजही उपेक्षित राहिलेला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना सरकारला राबवाव्या लागतील. तरच शेतकरी टिकणार आहे. शेतीमालाला योग्य दर मिळणे ही काळाची गरज बनलेली आहे. शेतीमालाला मिळणारा कमी हमीभाव, अवेळी पडणारा पाऊस, शेतकऱ्यांना न मिळणारी योग्य बाजारपेठ या कारणांनी देशातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर सरकारने वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. यावेळी भारतातील अमेरिकेचे राजदूत खासदार अनंतकुमार हेगडे, भाजपचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम रूपाला, भारतीय जनता किसान मोर्चाचे राष्ट्रीय सचिव सगुणकर राव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)हमी भाव द्यावाशेतीमालाला हमीभाव मिळावा१३० कोटी लोकांचे पोट भरणारा शेतकरी आजही उपेक्षित शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने वेळीच उपाययोजना राबविल्या तरच शेतकरी टिकेलबाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी देशातील केवळ २७ टक्के लोकांसाठी अन्न सुरक्षा कायदा
शेतकऱ्यांची सुरक्षाही महत्त्वाची
By admin | Updated: November 11, 2014 00:12 IST