शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा तरुणांना लागू होणाऱ्या योजना प्रस्तावित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST

कोल्हापूर : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास, औद्योगिक वसाहत, कृषी आणि जिल्हा उद्योग केंद्राशी निगडीत कोण कोणत्या ...

कोल्हापूर : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास, औद्योगिक वसाहत, कृषी आणि जिल्हा उद्योग केंद्राशी निगडीत कोण कोणत्या योजना लागू होतील, त्या योजनांचा लाभ तरुणांना कसा मिळू शकेल याबाबतच्या योजना प्रस्तावित करा, अशा सूचना सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी गुरुवारी केल्या.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित या उपकेंद्राचा मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन योजना राबविण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, निबंधक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.

अशोक काकडे म्हणाले, सारथी संस्थेस ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार येथील मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासाकरिता सूक्ष्म नियेाजन करण्यात येत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने ज्या संस्था, घटकांकडून सूचना मिळाल्या आहेत त्यांचा विचार करून त्या अंमलात आणल्या जातील. पुण्यातील सारथी संस्था सुरू झाल्यापासून पहिल्या वर्षी एम.फीलच्या ५०२ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आल्या आहेत.

यावेळी शिवाजी विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्यासह सारथीशी संलग्न संस्थांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा कौशल्य विकासचे सहायक संचालक संजय माळी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

--

असंतोष का हे समजून घ्या

डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, मराठा समाजातील तरुणांची मुस्कटदाबी, अन्याय कोठे होत आहे, त्यांचे मागासलेपण, या मुलांमध्ये एवढा असंतोष का आहे हे शोधून त्यावर उपाययोजना करा. आपल्याला न्याय मिळत आहे असे त्याला वाटावे, असे काही करा. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राची व्याप्ती वाढवताना पदव्युत्तर, पीएच.डी., फेलोशिप सुरू करताना, विषय सुचवण्यासह लागेल ते सहकार्य करू.

---

फोटो नं ०८०७२०२१-कोल-सारथी०१

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सारथी उपकेंद्राची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, निबंधक अशोक पाटील उपस्थित होते.

----

०२

ओळ : यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

---