शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकारमुळे रखडला प्रकल्प

By admin | Updated: July 15, 2014 00:29 IST

लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तोकडे : भ्रष्टाचारावरही पांघरुण; प्रकल्पही अर्धवटच

विश्वास पाटील - कोल्हापूर , तीन आमदारांच्या व्यक्तिगत पातळीवर काही प्रयत्न झाले तरी हा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रकल्प म्हणून सगळ््यांनी संघटित प्रयत्न न केल्याने धामणी धरणाचे काम इतकी वर्षे भिजत पडले आहे. या धरणाचे कार्यक्षेत्र राधानगरी, करवीर व पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांशी संबंधित आहे. परंतु या मतदारसंघांतील आमदारांनी व तत्कालीन खासदारांच्या पातळीवरही प्रकल्पाच्या कामाला जोर देता आलेला नाही. प्रकल्पाची सुधारित मान्यताच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा खात्याचा कारभार असूनही आमदार के. पी. पाटील या प्रकल्पासाठी काहीच करू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे. सरकारने या प्रकल्पातील भ्रष्टाचाराचीही चौकशी केली नाही व धरणाचे कामही रखडले या दोन्ही गोष्टी राज्यातील काँग्रेस आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार असताना या धरणास मंजुरी मिळाली. त्यावेळी तत्कालीन आमदार संपतराव पवार यांनी त्यासाठी बराच पाठपुरावा केला होता. त्यांची दोन टर्म प्राथमिक मंजुरी मिळवण्यातच गेली. त्यानंतर पी. एन. पाटील हे आमदार झाले. परंतु त्यांच्या काळात प्रकल्प वनविभागाच्या मंजुरीच्या कचाट्यात अडकला. २००९ मध्ये कामास चांगली गती मिळाली परंतु तोपर्यंत २००९ ला त्यांचा पराभव झाला. पुढे चंद्रदीप नरके आमदार झाले. इतकी वर्षे धरणाचे काम अर्धवट राहण्यात काही महत्त्वाची कारणे आहेत. त्यातील सगळ््यात महत्त्वाचे कारण या धरणाच्या बुडित व लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांचा राजकारण्यांवर दबाव नाही. त्यांची संख्या मर्यादित आहे. परवाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठरविले व परत त्यांनीच तो मागेही घेतला. तीन आमदारांचे कार्यक्षेत्र असल्याने लोकांतही मजबूत संघटन नाही. तीनपैकी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे विरोधी पक्षाचे. परंतु त्यांना विधानसभेत सरकारने दादच लागू दिली नाही. धामणी धरणाचा प्रश्नही लागू नये, अशी व्यवस्था पाटबंधारे खात्याकडून विधान मंडळ सचिवालयात पैसे देऊन केली जात होती, असाही अनुभव त्यांना आला. आमदार विनय कोरे व आमदार के. पी. पाटील हे सत्तारुढ गटाचे आमदार. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चितच जास्त होती परंतु तोपर्यंत प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या (सुप्रमा)फेऱ्यात अडकल्याने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा ते काहीच करू शकले नाहीत. आजही या प्रकल्पास सुधारित मान्यता नाही. त्यामुळे निधी मंजूर होत नाही. चौदा वर्षे प्रकल्प रखडल्यावर त्या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वत:चा मार्ग शोधला. सिंचनासाठी हे लोक स्वखर्चाने दहा ते अकरा ठिकाणी मातीचे बंधारे घालतात. त्यासाठी दोन-तीन लाख रुपये खर्च करतात. पावसाळ््यात ते फोडून दिले जातात. त्यामुळे नदी उथळ होत आहे. पाण्यातील जलचरांवरही त्याचा परिणाम झाला आहे परंतु त्याची फिकीर कुणाला नाही. धरण झाले असते, शेती पाण्याखाली असती तर अर्थकारण सुधारले असते. परंतु आज या भागातील गोरगरिब माणूस सेंट्रिंगच्या कामावर जातो. कोकणात लाकूडतोड करतो. गुऱ्हाळघरांवर काम करतो. त्याच्या कंबरेची लंगोटी अजून गेली नाही. गरिबीमुळे व्यसनाधीनता वाढली, असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण झाले आहेत. परंतु त्याच्या सोडवणुकीचा कोणताच कृती आराखडा सरकारकडे आज तरी नाही.बाबमूळ तरतूदसुप्रमा तरतूदवाढएकूण वाढीशी टक्केवारी१दरसूचीतील वाढ९६.०९२८९.२६१९३.१७ २९.१७२भूसंपादन,पुनर्वसन,२.३१५४.१८५१.८७७.८३वन जमीन व एनपीव्हीमुळे३प्रकल्प व्याप्तीमुळे वाढ ००.००१८०.५७१८०.५७२७.२७४संकल्पचित्रामुळे वाढ ००.००१११.०७१११.०७१६.७७५इतर कारणे ००.००००.००००.००००.००६ईटीपीमुळे वाढ२१.९०१४७.४७१२५.५७१८.९६एकूण१२०.३०७८२.५५६६२.२५६.२५ पटवर्षआर्थिक तरतूद प्रत्यक्ष खर्च (कोटींमध्ये)(कोटींमध्ये)१९९७-९८००.०९००.०९१९९८-९९००.०७००.०७१९९९-००००.०७००.०७२०००-०१००.२१००.२१२००१-०२१९.६२१९.६२२००२-०३१०.५६१०.५६२००३-०४२३.२५२३.२५२००४-०५००.०८००.०८२००५-०६११.२४११.२४२००६-०७००.१५ ००.१५२००७-०८००.०७००.०७२००८-०९४३.२६ ४३.२६२००९-१०९९.३८९९.३८२०१०-११२२.१८२२.१८२०११-१२४६.४६४६.४६२०१२-१३१६.९५१६.९५