शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

गुळाचे दर पडल्याने उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 01:00 IST

हंगाम अंतिम टप्प्यात : रव्यांची आवक घटली

प्रकाश पाटील --- कोपार्डे  --यावर्षी ऊस उत्पादनात घट झाल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर गुळाला शेवटच्या टप्प्यात ४००० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळू लागला; पण साखर कारखान्यांना जाणारा ऊस गुऱ्हाळघरांसाठी खरेदी करणाऱ्या गुऱ्हाळ मालकांना गुळाचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल कमी झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. आता गूळ उत्पादन कडू झाले असल्याच्या प्रतिक्रिया गुऱ्हाळघर मालकांकडून व्यक्त होत आहेत. मागील वर्षी मार्च ते मे पाणीटंचाई व जून ते आॅगस्ट अतिपाऊस यामुळे ऊस उत्पादन कमी झाले. आपले गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी साखर कारखान्यांनाही एफआरपीपेक्षा १७५ रुपये जादा दर द्यावा लागला. यामुळे उसउत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनाकडे पाठ फिरविली. जिल्ह्यातील १२०० गुऱ्हाळघरांपैकी केवळ ४०० ते ५०० गुऱ्हाळघरेच सुरू झाली. पण, हंगामाच्या सुरुवातीला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर डिसेंबर ते जानेवारी दरम्यान तीन हजार रुपयांच्या खाली आल्याने शेतकरी गुऱ्हाळघरांना ऊस देईनात. या दरम्यान गुऱ्हाळघर मालकांनी स्वत:च्या मालकीच्या उसाचे गाळप करण्यास सुरुवात केली. मात्र, जानेवारी अखेरपासून पुन्हा गुळाला चांगले दर येऊ लागल्याने ऊस उत्पादकांपेक्षा गुऱ्हाळघर मालकांनीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तीन हजार ते ३५०० रुपये प्रतिटन दराने ऊस खरेदी केला. ऊस उत्पादकही आपल्या उसाचे मार्केटिंग करू लागले. साखर कारखान्यापेक्षा ४०० ते ५०० रुपये जादा दर मिळत असल्याने गुऱ्हाळघरांना वजनावर ऊस गाळपासाठी देऊ लागले. मात्र, आठ दिवसांपासून गुळाचे दर पुन्हा गडगडले असून, ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल मिळणारा दर ३५०० रुपये ते ४००० रुपयांवर आल्याने गुऱ्हाळघर मालक पुन्हा अडचणीत सापडला आहे. अडीच क्विंटल गूळ उत्पादनाच्या एकत्रित खर्चाची बेरीज मारली असता ९ हजार ८४० रुपये खर्च येत असून, उत्पन्न मात्र १० हजार रुपयांचे मिळत असल्याने गुऱ्हाळघर मालक हबकला आहे. ‘भिक नको, पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची वेळ गुऱ्हाळघर मालकांवर आली आहे. आता जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्याने विकत घेतलेला ऊस गुऱ्हाळात गाळप केल्याशिवाय आता गुऱ्हाळमालकांसमोर पर्याय उरलेला नाही. एका आदनाला अडीच क्विंटल गूळ तयार होतोसर्वसाधारण यासाठी येणार खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या लेखाजोखाऊस-सव्वादोन टन (३००० रूपये टन) - ७५०० रूपयेएकूण : ९८४० रुपये खर्चफेब्रुवारीमध्ये गुळाला मिळणारा दर पाहता तो पाच हजारांवरती पोहोचेल, असे चित्र होते. पण, ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल दरात घसरण झाल्याने साखर कारखान्यांपेक्षा जादा दर देऊन खरेदी केलेल्या उसापासून गूळनिर्मिती तोट्यात चालली आहे. ३००० ते ३३०० रुपये दराने ऊस खरेदी केला असून, सध्याचा मिळणारा ४००० हजार रुपये दरही परवडत नाही.- राजू वडगावकर, गुऱ्हाळघर मालक शिंदेवाडी, ता. करवीर.जर अडीच क्विंटल गुळाला सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तरी १० हजार रुपये मिळतात. आणि खर्च ९ हजार ८४० रुपये होतो. शेतकऱ्याच्या हातात उरतात केवळ १६० रुपये. यावरून गूळ उत्पादन किती तोट्याचे आहे, हे स्पष्ट होते.