शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्यांनंतर झालेल्या मुलीची मिरवणूक

By admin | Updated: December 1, 2015 00:16 IST

मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यवृंद होता आणि त्याच्यापाठोपाठ एका ट्रॉलीमध्ये भारतमाता, झाशीची राणी, मदर तेरेसा अशा वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी व अन्य मुली होत्या,

इचलकरंजी : जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्येविषयी शासनाकडून विशेष सजगता पाळली जात असतानाच वस्त्रनगरीत मात्र एका कुटुंबाने मुलीचा जन्म झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. अवघ्या चार दिवसांच्या मुलीची शहरातील मुख्य मार्गांवरून सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये अंगणवाडीतील विद्यार्थिनी, सेविका व मदतनीस आणि आवाज गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही भाग घेतला.जिल्ह्यात स्त्री-भ्रूणहत्या होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये ओंकार ठोंबरे व प्रियांका ठोंबरे (रा. डॉ. लांडे यांच्या दवाखान्यामागे, भोनेमाळ-इचलकरंजी) या दाम्पत्याला गुरुवारी (दि. २६) एका खासगी दवाखान्यामध्ये कन्यारत्न झाले. ठोंबरे कुटुंबामध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून मुलगीच नव्हती. त्यामुळे ठोंबरे कुटुंबीयांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. दवाखान्यातून नवजात कन्येला घरी जाण्याची मुभा मिळेल, त्यादिवशी जनता चौकापासून शिवाजी पुतळा, शाहू पुतळा मार्गे भोने माळातील ठोंबरे यांच्या घरापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या या निर्णयास अंगणवाडी क्र. ५६ मधील विद्यार्थिनींनी आणि आवाज गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे ठरवून पाठिंबा दिला. त्याप्रमाणे रविवारी सकाळी ठोंबरे कुटुंबीयांच्या या कन्येची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीच्या अग्रभागी वाद्यवृंद होता आणि त्याच्यापाठोपाठ एका ट्रॉलीमध्ये भारतमाता, झाशीची राणी, मदर तेरेसा अशा वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी व अन्य मुली होत्या, तर त्यापाठोपाठ एका खासगी गाडीमध्ये कन्येला घेऊन प्रियांका ठोंबरे आणि नातेवाइक महिला बसल्या होत्या. ठोंबरे कुटुंबीयांतील अन्य मंडळींबरोबर त्यांचे नातेवाइकसुद्धा या मिरवणुकीला उपस्थित होते. कन्येची मिरवणूक पाहून अनेकांनी ठोंबरे कुटुंबीयांचे कौतुकही केले.