शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

बसवेश्वरांच्या जयघोषात मिरवणूक

By admin | Updated: May 10, 2016 02:33 IST

शिव-बसव जयंती : वाद्यांचा गजरासह ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापूर : ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय....’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ असा अखंड जयघोष... त्याच्या जोडीला पारंपरिक वाद्यांचा गजर... ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने झालेले स्वागत... अशा उत्साही वातावरणात सोमवारी सायंकाळी महात्मा बसवेश्वर यांची पालखी मिरवणुकीची शोभायात्रा शहरातून निघाली. त्यामध्ये लिंगायत समाजबांधवांचा सहभाग लक्षणीय होता.युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त ‘शिव-बसव जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत सोमवारी पालखी मिरवणूक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठ येथे या मिरवणुकीचे उद्घाटन चित्रदुर्ग मठाचे प. प. श्री. बसव महंत महास्वामीजी, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक शेटे, तात्या कापसे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.महात्मा बसवेश्वरांची मूर्ती पालखीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापाठोपाठ असलेल्या वाहनावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवली होती. त्याच्या मागे ‘पाणी वाचवा...’, ‘झाडे लावा...’, असे प्रबोधनपर फलक लावलेल्या रिक्षा होत्या. अशा पद्धतीने प्रबोधनाचा जागर करत, ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय...’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा जयघोषात आणि पारंपरिक बँडचा समधुर निनाद अशा मंगलमय वातावरणात शहरातील दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महापालिका, शनिवार पेठ-गवळी गल्ली, तेली गल्ली मार्गावरून मिरवणूक निघाली. ठिकठिकाणी या मिरवणुकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत व फुले-रांगोळ्यांनी स्वागत करण्यात आले. रात्री नऊच्या सुुमारास चित्रदुर्ग मठ येथे ही मिरवणूक विसर्जित झाली. यामध्ये लिंगायत समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त सोमवारी शहरातून लिंगायत समाजबांधवांतर्फे बसवेश्वरांची भव्य पालखी मिरवणूक शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये चित्रदुर्ग मठाचे प. पू. श्री. बसव महंत महास्वामीजी, विवेक शेटे, तात्या कापसे, राजू वाली, आदी सहभागी झाले होते.