शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’प्रश्नी संघर्ष पेटणार

By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST

बचाव कृती समितीचा विरोध : निविदेकडे पाठ, विक्री अटळ

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे विक्रीची चर्चा सुरू आहे. परिणामी ‘दौलत’प्रश्नी पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. निविदा ९ एप्रिलला काढली आहे. मंगळवारअखेर एकही निविदा आलेली नाही. अंतिम मुदतीपर्यंत निविदा न आल्यास जिल्हा सहकारी बँक कर्जापोटी कारखान्याची विक्री करणार आहे. याची कुणकुण लागल्यामुळे ‘दौलत बचाव कृती समिती’ याविरोधात आवाज उठवीत आहे. चुकीच्या कारभारामुळे कारखान्यावर सुमारे ३८३ कोटींचा कर्जाचा डोंगर आहे. तीन वर्षांपासून कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेचे फेब्रुवारी २०१५ अखेर ६० कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज कारखान्याकडे थकीत आहे. मध्यंतरी कर्ज वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना कोंडून घालण्याचा प्रयत्न झाला होता. गेल्या महिन्यात थिटे पेपर्स कंपनीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. बँकेची येणी वसुलीचा अडथळा दूर झाला आहे. वसुलीचाच एक भाग म्हणून कारखाना भाड्याने देण्यासाठी बँकेने निविदा काढली आहे. निविदा भरताना एक कोटी रुपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. याशिवाय बँकेची देणी भागवूनच कारखाना चालविण्यास घेण्याची अट आहे. त्यामुळे एकही निविदा आलेली नाही. निविदा भरण्याची अंतिम मुदत शुक्रवार (दि. १७) पर्यंत आहे. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कारखाना विक्रीचा पर्याय सांगितला होता. त्यामुळे शासनाकडून मदतीच्या अपेक्षाचा पदाधिकारी, सभासद, कर्मचाऱ्याचा भंग झाला आहे. ‘दौलत’ बचाव कृती समितीचा ठेव योजनेद्वारे रक्कम उभारणी सुरू केली आहे. परंतु, कर्जाची रक्कम मोठी असल्यामुळे ठेव योजनेतून किती पैसे गोळा होणार, असाही प्रश्न आहे. शासनाने हात झटकले, चालविण्यास घेणाऱ्यांनी पाठ फिरविली तर ‘दौलत’वर विक्रीची वेळ येणार, हे स्पष्ट आहे. (प्रतिनिधी)