शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून खासगी आराम बस वाहतूक पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्देशाचे पालन करून आज, सोमवारपासून कोल्हापुरातून बाहेर जाणारी खासगी आराम ...

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्देशाचे पालन करून आज, सोमवारपासून कोल्हापुरातून बाहेर जाणारी खासगी आराम बससेवा पूर्ववत होणार आहे. प्रवाशांना ॲंटिजन अथवा आरटीपीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे.

राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध व्यवसायांवर निर्बंध आणले आहेत. त्यात एस.टी.ची बससेवाही बंद केली आहे. मात्र, प्रवाशांची सोय व्हावी याकरिता खासगी आराम बसेसना अटी-शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यानुसार ५० टक्के आसन क्षमता, संपूर्ण बस सॅनिटाईझ करून घेणे, प्रत्येक प्रवाशाची ॲंटिजन चाचणी, थर्मल चाचणी आवश्यक केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जेथे प्रवासी उतरणार आहेत, तेथे एकच थांबा करावा. येणाऱ्या प्रवाशांची ॲंटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करून बस पुढे जाऊ द्यावी. कोल्हापूर, इचलकरंजी शहर, शाहूवाडी, गडहिंग्लज येथील बस वाहतूक संघटनेचा प्रतिनिधी उपस्थित राहणे गरजेचे आहे. सर्व नियमांची अंमलबजावणी होती की नाही याची जबाबदारी या प्रतिनिधीवर राहणार आहे. कोल्हापुरातून मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नांदेड, नागपूर, बेंगलोर, हैदराबाद आदी मार्गावर बसेस ये-जा करणार आहेत. याकरिता सर्व चाचण्या करून त्याचे अहवाल प्रवाशांनी आधीच तयार करून घ्यावेत. त्यामुळे वेळेची बचत होईल. खासगी आराम बसेसना ई-पास आवश्यक नाही. तरीसुद्धा त्याची मागणी प्रशासनाकडून केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाकडे दाद मागण्यात आली आहे. तरी या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन खासगी बस वाहतूक संघटनेतर्फे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी केले आहे.