शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 01:08 IST

२३ शाखा रडारवर : ‘आयकर’कडून संशयास्पद खात्यांची तपासणी

सांगली : नोटाबंदीनंतर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या संशयास्पद व्यवहारांची व संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी आयकर विभागाने सोमवारी जिल्हा बँकेच्या सांगलीतील मुख्य शाखेत छापा टाकला. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या २३ शाखांची तपासणी आयकर विभागामार्फत सुरू झाल्याचे समजते.आयकर विभागाच्या सात अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी दुपारी दीड वाजता बँकेत दाखल झाले. त्यांनी अचानक बँकेशी संबंधित नसलेल्या सर्व लोकांना बाहेर काढले. अधिकाऱ्यांना तातडीने सर्व कागदपत्रे एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीला सुरुवात झाल्यानंतर बँकेभोवती पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्यांना अटकाव केला जात होता.दिवसभर या पथकाने तपासणी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या पंधरा दिवसात नाबार्डनेही तपासणी केली होती. प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या जिल्ह्यातील इस्लामपूर, तासगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, सावळज, कडेगाव, विटा, मिरज मार्केट यार्ड, सांगली मार्केट यार्डसह १६ शाखांची तपासणी केली होती. याशिवाय अन्य तालुकास्तरीय शाखांचीही तपासणी करण्यात आली होती. सरासरी प्रमाणापेक्षा जास्त उलाढाल झालेल्या एकूण १९ शाखा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. नाबार्डच्या पथकाने याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे सादर केला होता. दोन टप्प्यात ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल आयकर विभागालाही दिला होता. ज्या खातेदारांनी एक लाखाहून अधिक रकमेचा भरणा खात्यात केला आहे, अशा सर्व खातेदारांची यादी वित्तीय आसूचना एककनेही (फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट) मागविली आहे. २0 डिसेंबर रोजी याबाबतची यादी जिल्हा बँकेने संबंधित खात्याकडे पाठवून दिली. अशा सर्व स्तरावर तपासण्या झाल्यानंतर आयकर विभागाने छापा टाकला आहे. नाबार्डने १० डिसेंबर रोजी ज्यावेळी जिल्हा बॅँकेच्या मुख्य शाखेतून जुन्या नोटांबाबतची माहिती घेतली, त्यावेळी १९ शाखांमधील जमा झालेल्या रकमा प्रमाणापेक्षा जास्त आढळून आल्या. या एकोणीस शाखांपैकी सर्वात जास्त उलाढाल असलेल्या सहा शाखांची तपासणी सुरुवातीच्या टप्प्यात झाली होती. (प्रतिनिधी)मोबाईल बंदअधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल दुपारपासून बंद होते. बँकेचा मुख्य दरवाजा वगळता बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. बँकेत दुपारपासून कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे दिवसभर बँकेच्या आवारात स्मशानशांतता दिसत होती. रात्री उशिरापर्यंत खात्यांच्या तपासणीचे काम सुरू होते. तीन दिवसांत ३०० कोटी१0 नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत एक दिवसाच्या बंदचा अपवाद वगळता, तीन दिवस जुन्या नोटा सांगली जिल्हा बँकेने स्वीकारल्या. या तीन दिवसांत बँकेकडे ३00 कोटी ५ लाख १६ हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात जमा झाले होते. यामध्ये १ लाख ३ हजार ८0४ व्यक्तिगत खातेदारांनी २0८ कोटी ७१ लाख १५ हजार रुपये, व्यक्तिगत कर्जदारांनी ३१ कोटी ६६ लाख ३४ हजार रुपये, तर संस्थांकडून ५९ कोटी ६७ लाख ६७ हजार रुपये जमा केले आहेत.