शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

वेदगंगा नदीतील प्रदूषण रोखा

By admin | Updated: December 1, 2015 00:15 IST

भुदरगड संघर्ष समितीची मागणी : गारगोटीतील सांडपाण्यावर उपाय करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

 गारगोटी : गारगोटीचा विस्तार झपाट्याने होत आहे; मात्र पर्यावरणसंदर्भात फारसे गांभीर्य नसल्याने गावाचे सांडपाणी वेदगंगा नदीत मिसळते. परिणामी नदीचे पाणी दूषित होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित खात्यास आदेश द्यावे, या मागणीचे निवेदन भुदरगड तालुका संघर्ष समिती यांच्या वतीने तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी गावातील बहुतांश सांडपाणी वेदगंगा नदीत मिसळते. १२ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेली पाणी टाकी निकामी झाली असल्याने सहा लाख लिटर पाणी साठवून त्यांचे वाटप केले जाते. यातील चार लाख लिटर पाणी हे सांडपाणी रूपात वेदगंगेत मिसळते. रेखानगर, शिवाजीनगर, नवीन बसस्थानकजवळील वसाहतीचे सांडपाणी ओढ्याला जाऊन ते नदीत मिसळते. मौनी विद्यापीठ ते गारगोटी बाजारपेठेतील पाणी कैदी घाटावर, सोनाळीतील सांडपाणी सोनाळी घाटावर, जुनी गारगोटीचे पाणी तुळसी घाटावर जाऊन नदीत मिसळते. यामुळे वेदगंगा नदीचे पाणी दूषित होत आहे. संबंधित प्रशासन स्वच्छ गारगोटी, सुंदर गारगोटी अभियान राबवीत आहे. मात्र, त्यापूर्वी शहराच्या सांडपाण्याची निर्गत लावून नदीचे प्रदूषण रोखावे यासाठी ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर प्रयत्न करावे, अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देण्यासाठी अमित देसाई, शरद मोरे, भाजप तालुकाध्यक्ष आलकेश कांदळकर, प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, अशोक जगताप, आदित्य देसाई, संग्राम फोफळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.