शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानमधील धर्मविरोधी कृती रोखा

By admin | Updated: January 11, 2016 01:08 IST

राष्ट्रीय हिंदू आंदोलनची मागणी : काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी निदर्शने

कोल्हापूर : शनिशिंगणापूरसह इतर देवस्थानांमधील धर्मविरोधी कृती रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ‘पनूून काश्मीर’ द्यावे या मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनतर्फे रविवारी छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली.दुपारी बाराच्या सुमारास सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकवटले. घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.काश्मीर खोऱ्यातील स्वतंत्र भारतात पाकिस्तानपुरस्कृत जिहादी दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य करून आक्रमणे करून अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. इतरांवर अत्याचार करून त्यांना धमकावण्यात आल्याने साडेचार लाखांहून अधिक हिंदूंना काश्मीर खोऱ्यातून सन १९९० ला विस्थापित व्हावे लागले. या घटनेला दि. १९ जानेवारी २०१६ या दिवशी २६ वर्षे पूर्ण होत आहेत. सन १९९०पासून या विस्थापित हिंदंूचे अद्याप पुनर्वसन झालेले नसून ते न्यायापासून वंचित आहेत. तरी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना ‘वंशसंहार’ म्हणून ओळखले जावे. त्या अत्याचारांची न्यायिक लवादाद्वारे ठरावीक कालमर्यादेत चौकशी करावी. या हिंदूंच्या सुरक्षित परतीसाठी स्वतंत्रपणे ‘पनून काश्मीर’ नावाच्या केंद्रशासित क्षेत्रास मान्यता द्यावी.त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथील मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथऱ्यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. सध्या सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष भक्त शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांनाच बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे. हा विषय स्त्री मुक्तीचा नसून पूर्णत: आध्यात्मिक आहे तरी तथाकथित पुरोगामी संघटना धर्मातील परंपरा, रूढी आणि श्रद्धा यावर जाणीवपूर्वक आघात करत आहेत. धर्माच्या दृष्टीने हे वर्तन अयोग्य आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक धर्मविरोधी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (एनसीईआरटी) अभ्यासक्रमात इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात भारतीय संस्कृतीविषयी खोटी व अवमानकारक माहिती देणारे लिखाण केले आहे. त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आंदोलनात मधुकर नाझरे, शिवाजीराव ससे, संभाजीराव भोकरे, शिवानंद स्वामी, राजू यादव, डॉ. मानसिंग शिंदे, संजय कुलकर्णी, अंजली कोटगी, सुरेखा काकडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)