शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या तयारीला लागा

By admin | Updated: August 10, 2015 01:17 IST

चंद्रकांतदादा पाटील : सत्तेजवळ येणाऱ्या काँग्रेसवाल्यांना बाजूला ठेवा : सुरेश हाळवणकर

कोल्हापूर : रस्ते, गटारी हे प्रश्न मार्गी लावत असतानाच गावपातळीवर रोजगार निर्मितीच्या माध्यमातून पक्ष मजबूत करा, असे आवाहन करीत जिल्हा बॅँक, बाजार समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत पक्षाने चंचुप्रवेश केला असला तरी आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत किमान २५ जागा निवडून आणण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले. भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांचा कळंबा येथे रविवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर होते. मंत्री पाटील म्हणाले, एकदा निवडून आलेली पक्षाची जागा किमान २५ वर्षे कायम राहावी, या जबाबदारीतून काम करावे. कर्तव्य व कायद्याची सांगड घालून ग्रामपंचायतीच्या पातळीवर काम करा. कामाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची संख्या वाढवा. गावच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही मंत्री पाटील यांनी दिली. रोजगार निर्मिती करीत असताना मोठ्या प्रकल्पापेक्षा लहान-लहान प्रकल्प उभे करावेत. सध्या आपणाला गोड्या तेलाची गरज आहे, यासाठी तेलनिर्मिती करून त्याचे ब्रॅँडिंग करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. विरोधकांबरोबर पक्षातील नेत्यांना चिमटा काढत आमदार हाळवणकर म्हणाले, सत्तेसाठी येणारे अनेकजण आहेत. त्यांचे स्वागत केले पाहिजेच; पण त्याबरोबर विचाराने प्रेरित होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर प्रत्येक तालुक्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनता दरबार घेऊन कार्यकर्त्यांना उभारी द्यावी. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची पेरणी आतापासून करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेचे किमान २५ सदस्य निवडून आणायचे आहेत. त्या दृष्टीने मतदारसंघ आतापासूनच बांधा. सत्ता असली की अनेक पाखरे येतात. १९९५ ला तसेच झाले. सत्ता गेल्यानंतर गोळा झालेली पाखरे कधी उडून गेली ते कळलेच नाही. त्यामुळे कॉँग्रेसवाल्यांची शिफारस कोणी करू नये. भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी स्वागत केले. आमदार अमल महाडिक, महेश जाधव, हिंंदुराव शेळके, सुरेशदादा पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक अनिल पाटील, विजया पाटील, सदानंद कोरगावकर, आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी आभार मानले. खरी पडली केरात अन् चोरटी...कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत कामाबरोबर नीतिमत्ता व पक्षशिस्तीनुसार कामे घेऊन यावीत. नाहीतर ‘खरी पडली केरात आणि चोरटी सुटली जोरात’ अशी अवस्था होते. यासाठी कॉँग्रेसवाल्यांना बाजूला ठेवा, असे आवाहन आमदार हाळवणकर यांनी केले. '‘जवाहर’मध्ये पहिला संचालक सहकारी संस्थेत शासननियुक्त प्रतिनिधी नेमण्याचा कायदा मंजूर झाला आहे. आवाडे यांच्या जवाहर साखर कारखाना व सूतगिरणीमध्ये पहिल्यांदा शासननियुक्त सदस्य नेमून त्यांच्या भानगडीवर लक्ष ठेवणार असल्याचा इशारा आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.