शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माॅन्सूनपूर्व सरींचा कोल्हापूरला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

कोल्हापूर : ढगांच्या गडगडासह आलेल्या माॅन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या ...

कोल्हापूर : ढगांच्या गडगडासह आलेल्या माॅन्सूनपूर्व सरींनी गुरुवारी दुपारी तासभर कोल्हापूरला अक्षरक्षा झोडपून काढले. दुपारी अंगतूक पाहुण्यासारख्या आलेल्या या सरींनी टपोऱ्या थेंबासह जोरदार बॅटिंग केल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. पावसाच्या जोरदार माऱ्यापुढे रेनकोट, छत्र्यांचा देखील टिकाव लागला नाही. धुवांधार पावसामुळे भरदुपारी सर्वत्र अंधार दाटल्याने वाहनाधारकांवर हेडलाईट लावून वाहने चालवण्याची वेळ आली. मोठ्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे पोल्ट्रीची भिंती पडून तीन मजूर मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटनाही घडली.

गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होत होते, पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिली होती. गुरुवारीदेखील सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारी दोननंतर वातावरण बदलू लागले. काळ्याभोर ढगांची आकाशात गर्दी वाढली आणि बघता बघता पावनेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला तुरळक असणाऱ्या पावसाने नंतर वेग पकडला आणि धुवांधार बरसण्यास सुरुवात केली.

पावसाचा जोर इतका प्रचंड होता की क्षणात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. सखल भागांना तळ्याचे स्वरूप आले. पावसाच्या माऱ्यामुळे भर दुपारी अंधार पसरला. वाहनधारकांना हेडलाइट चालवून वाहने हाकावी लागली. चारनंतर पावसाचा जोर कमी झाला पण विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट कायम होता. संध्याकाळपर्यंत तुरळक पाऊस सुरूच होता.

जोरदार आलेल्या या पावसामुळे ओढे, नाल्यांना ओहळ आले. शहरातील जयंती नालाही ओव्हरफ्लो होऊन धबधब्यासारखा कोसळू लागला. शहरात अनेक घरात पाणी शिरल्याने पाऊस थांबल्यानंतर पाणी उपसण्याचे काम सुरु झाले. अजूनही बऱ्याच घरात पावसाळ्यापुर्वीची घरांची डागडुजी व शेकारणीची कामे लॉकडाऊनमुळे पूर्ण झालेली नाहीत. पावसाचा अंदाज आल्याने अनेक जण निवारा सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री टाकण्याची घाईगडबड करताना दिसत होते. तरीदेखील पावसाच्या प्रचंड माऱ्यामुळे गळती लागलीच. पाऊस थांबल्यानंतर साचलेले पाणी बाहेर काढण्याची कसरत करावी लागली.

चौकट

अत्यावश्यक सेवा विस्कळीत

लॉकडाऊन असल्याने बऱ्यापैकी सर्वच जण घरात असल्याने रस्ते तसे सामसुमच असतात, पण अत्यावश्यक सेवांची वर्दळ सुरूच असते. अचानक आलेल्या या पावसाने या सेवाही काही काळ विस्कळीत झाल्या.

चौकट

शिवारे तुंबली

संपूर्ण जिल्हाभर या पावसाने धूडगूस घातला. पेरणीसाठी तयार ठेवलेली शिवारेही पाण्याने तुंबली. त्यामुळे ज्यांनी धूळवाफ पेरण्या पूर्ण केल्या आहेत, त्यांची पीक उगवणीची चिंताच मिटली आहे, तर ज्यांच्या मशागती सुरू आहेत, त्यांचा मात्र आता खोळंबा होणार आहे. तासाभरापेक्षा जास्त वेळ पडलेल्या या पावसामुळे घातच विस्कटली आहे. मशागतीसाठी आता औजारे आत घालण्यासाठी किमान चार दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चौकट

आजही पावसाचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस जोरदार माॅन्सून सरी बरसतील, असा अंदाज बुधवारीच जाहीर केला होता. गुुरुवारी पहिल्याच दिवशी तो तंतोतंत खरा ठरला. आज शुक्रवारी देखील पावसाचा अंदाज आहे.

फोटो: ०३०६२०२१-कोल-पाऊस ०१, ०२

फोटो ओळ: कोल्हापुरात गुरुवारी दुपारी माॅन्सूनपूर्व सरींनी जोरदार तडाखा दिला. पावसाची तीव्रता इतकी होती भरदुपारी तीन वाजता दसरा चौकात असा अंधार दाटला होता.

फोटो: ०३०६२०२१-कोल-पाऊस ०१

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी माॅन्सूनपूर्व सरींनी जोरदार तडाखा दिला. पावसाची तीव्रता इतकी होती भर दुपारी तीन वाजता दसरा चौकात असा अंधार दाटला होता. फोटो : ०३०६२०२१-कोल- पाऊस ०३

फोटो ओळ : कोल्हापुरात गुरुवारी दुपारी माॅन्सूनपूर्व सरींनी जोरदार तडाखा दिला. तत्पूर्वी तासभर आभाळात ढगांची जणू धरतीवर येण्याची स्पर्धाच सुरू आहे की काय असे दिसत होते. राजेंद्रनगर जकातनाका येथे असाच पाऊस जमिनीकडे झेपावतानाचा क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला.