शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडची पायी प्रदक्षिणा चार जानेवारीला

By admin | Updated: December 26, 2014 23:44 IST

एकविसावे वर्ष : हिल रायडर्स अँड हायकर्सच्या उपक्रमाची नोंद लिम्का, एशिया बुकमध्ये होणार

कोल्हापूर : आजच्या आधुनिक आणि बदलत्या काळात तरुणांच्या मनामध्ये ऐतिहासिक गडसंवर्धन, इतिहास आणि पर्यावरणाची जाणीव व्हावी, या हेतूने प्रतिवर्षी हिल रायडर्स अ‍ॅँड हायकर्स गु्रपच्यावतीने ‘पन्हाळगड पायी प्रदक्षिणा’ आयोजित केली जाते. यंदा ही पायी प्रदक्षिणा मोहीम रविवारी (दि. ४ जानेवारी) आयोजित केल्याची माहिती गु्रपचे अध्यक्ष प्रमोद पाटील व ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज यांनी आज, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शिलाहाराच्या राजघराण्यातील गंडरादित्याची राजधानी बनलेला हा भव्य व उत्तुंगगड शिवरायांनी आदिलशाहीकडून जिंकून घेतला. वीर शिवा काशीद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्या असंख्य शिवभक्तांनी इथे अतुलनीय पराक्रम गाजविला आहे. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ल्याखाली पश्चिम घाटातील दुर्मीळ अशी जैवविविधता आहे. याची माहिती नव्या पिढीस व्हावी, याकरिता या मोहिमेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. यंदा या मोहिमेचे एकविसावे वर्ष असून यात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, शिवदुर्ग प्रतिष्ठान, सहजसेवा ट्रस्टनेही सहभागी होत उपक्रमाला बळ दिले आहे. या उपक्रमाची दखल लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस व आशिया बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस हेही घेणार आहेत. ही मोहीम एक दिवसाची असून, या मोहिमेत निसर्गप्रेमी, गडप्रेमी, इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांनी, आबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरत पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख विजय देवणे, चंदन मिरजकर, आदी उपस्थित होते.