गडहिंग्लज तालुका ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश इंगळे यांची निवड करण्यात आली. नेसरी वाचन मंदिराचे कार्यवाह वसंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या निवड झाल्या.
यावेळी संघाच्या सचिवपदी नारायण सुतार, उपाध्यक्षपदी बाळासाहेब मोर्ती, सदानंद पाटील, सहाय्यक सचिवपदी भरत पाटील, खजिनदारपदी संजय भोसले यांची निवड करण्यात आली.
ग्रंथालय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी दत्ता देशपांडे, उपाध्यक्षपदी बी. बी. कांबळे, राजेंद्र कोरवी, खजिनदारपदी प्रशांत देसाई, सचिवपदी संतोष भोसले, सहाय्यक सचिवपदी आण्णासाहेब कापसे यांची निवड करण्यात आली.
यावेळी एस. बी. पाटील, राजेंद्र खोराटे, विजय गुरबे, बी. जी. स्वामी, रमाकांत येसरे, के. डी. धनवडे, भिमाप्पा वाळकी, सुभाष थोरात, उमेश सावंत, दीपक पुजारी, शिवाजी होडगे, एस. बी. फुटाणे, शैलजा पाटील, लता गुरव, सुधा सावंत, माधुरी कुंभार, आदी उपस्थित होते.