शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रांतकचेरी’च्या ‘वहिवाटी’स गडहिंग्लज पालिकेचा विरोध!

By admin | Updated: December 27, 2014 00:33 IST

मंगळवारी होणार सुनावणी : ५० वर्षांपूर्वी भाड्याने दिलेली इमारत

राम मगदूम / गडहिंग्लज : ५० वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेली धर्मशाळा इमारत व जागेस वहिवाटदार म्हणून प्रांतकचेरीचे नाव लावण्यास गडहिंग्लज पालिकेचा विरोध आहे. शहर विकास आराखड्यात व्यापारी संकुलासाठी आरक्षित ही मोक्याची जागा पालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी विनंती नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.१७ जून १९५९ रोजी तत्कालीन कलेक्टरनी म्युनिसिपालिटीचे तत्कालीन प्रेसिडेंट यांना समक्ष विनंती केली. त्यानुसार जनतेच्या सोयीसाठी होणाऱ्या प्रांत कचेरीसाठी दोन वर्षे मुदतीकरिता सर्क्युलर मिटिंगने मंजुरी घेऊन १४६ रुपये इतक्या नाममात्र भाड्याने ही इमारत देण्यात आली. मात्र, मार्च २०१५ पर्यंतचे ४०,८९८ रुपये इतके भाडे अद्याप थकीत आहे.गडहिंग्लज बसस्थानकासमोरील सि.स.नं. १३२६ ची क्षेत्र ४७३०.५० चौ.मी. ही जागा ‘सार्वजनिक सरकारी धर्मशाळा वहिवाटदार म्युनिसिपालिटी, गडहिंग्लज’ या नावे प्रॉपर्टी कार्डावर नोंद आहे. १९६१ पासून मामलेदारांच्या कब्जेपट्टीने प्रांतकचेरीकडे वापरात आहे.वाढत्या शहराच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे म्हणून याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्याचे नियोजन असून, सदरची जागा परत मिळविण्यासाठी अनेक वर्षांपासून नगरपालिकेची धडपड सुरू आहे. मात्र, या जागेच्या हस्तांतरणास शासन टाळाटाळ करीत आहे.मंगळवारी होणार सुनावणीदोन-तीन महिन्यांपासून प्रांतकचेरीच्या जागेस ‘वहिवाटदार’ म्हणून नाव लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. अलीकडेच प्रांताधिकाऱ्यांनी या जागेची ‘मोजणी’देखील करून घेतली आहे. या जागेबाबत ‘पुनर्विलोकन’ करण्यासाठी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी (दि. ३०) सुनावणी होणार आहे.