शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन सराव करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने (केएसए) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी फिटनेस अँड स्पोर्टस्‌ या ...

येथील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने (केएसए) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंसाठी फिटनेस अँड स्पोर्टस्‌ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात १३९४ खेळाडू, प्रशिक्षक, पालक सहभागी झाले. अध्यक्षस्थानी ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पोवार आणि तायक्वॉंदोेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे होते. कोविडनंतर नव्याने सरावाला सुरुवात करताना पहिल्यांदा आपली शारीरिक क्षमता तपासावी. कारण, शरीरामधील स्नायू आकसण्यासह सहनशक्ती आणि क्षमता, गती कमी झालेली असणार, वजन कमी किंवा जास्त झालेले असणार आहे. त्यामुळे मैदानावर येताना घाई-गडबड न करता रिकव्हरी केली पाहिजे. त्यासाठी ४० ते ५० टक्के या पद्धतीने सराव करावा. सरावाचे वेळापत्रक करावे. दुखापती टाळण्यासाठी योग्य पद्धतीने वॉर्मअप, स्ट्रेचिंग, कुलडाऊन, हायड्रेशन, न्यूट्रिशन, प्रॉपर टेक्निकचा वापर करावा, असे ‌भारतीय हॉकी संघाचे माजी फिजिओथेरिपिस्ट डॉ. संदीप चौधरी यांनी सांगितले. कोविडमुळे मानसिक, शारीरिकदृष्ट्या खेळाडूंच्यामध्ये आलेले काही नैराश्य कसे कमी करता येईल यासाठी तज्ज्ञांसमवेत संवाद साधणे गरजेचे होते. त्यामुळे केएसएने ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केल्याचे संस्थेचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी प्रास्ताविकात सांगितले. मधुरिमाराजे छत्रपती यांनी आभार मानले. प्रथमोपचारासाठी सीपीसीआर कोर्स आणि पालकांसाठी कार्यशाळा लवकर घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केएसएचे फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

आत्मविश्वास, सुसंगती वाढवा

सतरा वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप भारतीय फुटबॉल संघाचे मेंटल कंडिशनिंग अँड पिक परफॉर्मन्स प्रशिक्षक डॉ. स्वरूप सावनूर यांनी खेळाडूची मानसिकता या विषयावर संवाद साधला. कोविडमुळे सध्या खेळाडूंचे मन विचलित झाले आहे. त्याला योग्य दिशा द्यावी. मानसिकता, आत्मविश्र्वास, कामगिरीतील सुसंगती वाढविली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.