शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

प्रॅक्टिस-मेननचा ‘धारदार’ खेळाडू

By admin | Updated: January 28, 2017 01:07 IST

--शरद मंडलिक

मंडलिक घराण्याला फुटबॉलचा मोठा वारसा आहे. हा वारसा शरदने समर्थपणे चालवला. प्रॅक्टिस क्लबकडून खेळताना त्याने स्थानिक तसेच बाहेरगावी झालेल्या अनेक स्पर्धा गाजवल्या. फुटबॉलमध्ये कारकिर्द घडवत असताना त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. हा आदर्श सध्याच्या खेळाडूंनी घेण्यासारखा आहे.शरद रंगराव मंडलिक यांचा जन्म ४ आॅगस्ट, १९५० ला कोल्हापूर येथे झाला. मंगळवार पेठेतील मंडलिक घराणे फुटबॉलशी फार निगडित आहे. मंडलिकांच्या घरातील घरटी एक तरी फुटबॉल खेळाडू सापडणारच. सुरेश मंडलिक (प्रॅक्टिस), बाळकृष्ण मंडलिक (बाळगोपाल), बाजीराव मंडलिक, अनिल, रोहित व मोहित अशी मंडलिक घराण्यातील खेळाडूंची फळी. त्यातच आपल्या धारदार, चतुरस्र खेळाने रसिक प्रेक्षकांचे मन मोहित करणारा ‘शरद मंडलिक.’साठमारी, शाहू मैदान, गांधी मैदान, शाहू, दयानंदचे मैदान, बऱ्याच वेळा मैदान उपलब्ध नाही झाले तर प्रभाकर स्टुडिओ, नजीकच्या शेतवडीतील रिकामी जागा. रेसकोर्स रस्ता या विविध मैदानांवर शरदचा फुटबॉल प्रगत झाला. शरदच्या घरातील सर्वांना शैक्षणिक वारसा लाभला होता. त्यामुळे लहानपणापासूनच खेळासह त्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे कुटुंबीयांनी दक्षतेने लक्ष ठेवले. भक्तिसेवा-विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शरदने समवयस्क लहान मुलांतून फुटबॉलचे धडे गिरविले. रबरी किंंवा टेनिस बॉलच्या साहाय्याने प्रॅक्टिस क्लबमधील मोठ्यांचा खेळ पाहून टेनिस बॉलवरच फुटबॉल खेळाचे तंत्र (टेक्निक) आत्मसात केले. कोल्हापुरात पूर्वी चार फूट ११ इंच मापाचे सामने पेठा- पेठांमधून चालत असत. हे सामने पाहण्यास भरपूर गर्दी असे. प्रॅक्टिस क्लबच्या या मिनी क्लबकडून शरद मिळेल त्या जागेवर खेळत असे. विद्यापीठ हायस्कूलच्या शालेय संघातून तो विशेष चमकला. शरदने वयाच्या १६ व्या वर्षांपासून फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. २० वर्षांची कारकीर्द त्याने आपल्या खेळाने गाजवून सोडली. शरदचे नातेवाईक मामा कै. आप्पा सूर्यवंशी व यशवंतराव आणि बाबा सूर्यवंशी हे प्रॅक्टिस क्लबचे एकेकाळचे गाजलेले फुटबॉल खेळाडू. त्यांनी शरदला प्रेरणा दिली व तेच त्याचे प्रशिक्षक होते. शरदचा शिडशिडीत बांधा, कमालीचा आत्मविश्वास. शरीर घोटीव आणि कमालीची चपळता. पोहण्याच्या सरावामुळे शारीरिक हालचाली गतिमान आहेत. फुटबॉलमधील सर्व किक्स, ट्रॅपिंंगचे प्रकार आत्मसात. शरदची साईड व्हॉली आणि लो-ड्राईव्ह किक कमालीची होती. त्याची सुरुवातीची संघातील खेळण्याची जागा लेप्ट इन होती. मात्र, संघाच्या गरजेनुसार नंतर सेंटर हाफ या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर खेळू लागला. प्रॅक्टिसची ही टीम फार भक्कम होती. कित्येक स्थानिक स्पर्धांतून शरद खेळला असून, त्यांने आपला ठसा रसिकांच्या मनावर उमटविला होता. शिवाय मिरज, सांगली, गडहिंंग्लज, बेळगाव, पुणे व मानाचा रोव्हर्स चषक खेळण्याची संधी त्याला मिळाली. बाहेरगावी आपल्या चौफेर खेळाने तेथील स्पर्धा शरदने गाजविल्या आहेत. त्याच बरोबर शिवाजी विद्यापीठ पश्चिम विभागातील स्पर्धांकरिता त्याची सलग दोन वेळा निवड झाली होती. या स्पर्धाही शरदने आपल्या खेळाने गाजवल्या. शरदने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. फुटबॉल स्पर्धा गाजवितच तो इंजनिअरिंगमधील डी.एम.ई. ही पदविका पास झाला. त्याला ‘मेनन अ‍ॅड मेनन’ या कारखान्यात इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. शरदचे उदाहरण केवळ फुटबॉल खेळून शिक्षणाकडे लक्ष न देता आपले करिअर वाया घालविणाऱ्यांसाठी आदर्शवत आहे. कोल्हापुरात आज असे कित्येक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत; पण त्यांची शैक्षणिक प्रगती नाही. शरदच्या सुदैवाने मेननच्या मालकांनी निवडक खेळाडू घेऊन एक चांगला, दर्जेदार फुटबॉल संघ बांधला होता. शरद या संघाचा कणा होता. कित्येक दिग्गज खेळांडू या संघात होते.शरदच्या मते खेळामुळे आरोग्य चांगले, निरामय राहिले. आजही अव्याहत पोहणे सुरू आहे. याशिवाय शरदने क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्स, हॉकी, बांबूउडी या सर्व खेळांत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. कोल्हापुरात शरदने फुटबॉल पंच म्हणूनही काम केले आहे. शिवाजी तरुण मंडळ व प्रॅक्टिस यांच्यामध्ये तीन दिवस हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगलेला सामना त्याला आजही आठवतो. त्याच्या मते ‘अजूनही फुटबॉल खेळात प्रगती नाही.’ (उद्याच्या अंकात : माणिक मंडलिक)