शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीसाठी उद्या शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: August 21, 2016 00:20 IST

दसरा चौकात ठिय्या : आज मध्यवर्ती बसस्थानकावर मेळावा

कोल्हापूर : अधिसूचना तातडीने काढून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने उद्या, सोमवारी दसरा चौकात शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार जनजागृती मेळाव्यात केला. शक्तिप्रदर्शनाचा भाग म्हणून सोमवारी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांसह शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी झाला. येत्या आठवड्यात हद्दवाढीच्या मागणीचा लढा तीव्र करत शासनाला हद्दवाढीच्या निर्णयासाठीभाग पाडू, असाही निर्धार केला. आज, रविवारी सायंकाळी सात वाजता मध्यवर्ती बसस्थानकावर महालक्ष्मी चेंबर्समध्ये दुसरा जनजागृती मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी भाकपचे सतीशचंद्र कांबळे, लालासाहेब गायकवाड, प्रताप देसाई, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, चंद्रकांत जाधव, सुरेश जरग यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बाबा पार्टे, वहिदा मुजावर, रेखा आवळे, बजरंग शेलार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)दबावतंत्र चालणार नाही : क्षीरसागरउजळाईवाडी विमानतळावर विमान उतरू देणार नाही, अशा पद्धतीची दादागिरी खपवून घेणार नाही. दबावतंत्र वापरून हद्दवाढ रोखण्याचा प्रयत्न नेत्यांनी बंद करावा, मतांच्या राजकारणासाठी शहरासह ग्रामीण भागाचे नुकसान करत आहेत. हद्दवाढीनंतर येणाऱ्या आय.टी.सह इतर उद्योगांमुळे ग्रामीण ग्रामीण भागाचे कल्याण होईल, असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. महापालिकेवर चुकीची टीका करून दबावतंत्र वापरत दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्यास ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असाही इशारा क्षीरसागर यांनी दिला. शासन बदलले, आरक्षणाचा उद्योग संपलाजमिनीवर आरक्षण टाकण्याचे उद्योग यापूर्वी झाले, आता शासन बदलले तसेच महापालिकेवरील स्थित्यांतरे झाल्याने आरक्षण टाकणे व उठविणे हा उद्योग यापुढे होणार नाही, असे भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी स्पष्ट केले. रवीकिरण इंगवले यांनीही टीका केली.अभी नहीं तो कभी नहींशहरवासीयांचा आता अंत पाहू नका, असे सांगत सोमवारच्या शक्तिप्रदर्शनात महापालिका, के.एम.टी., शाळा, महाविद्यालये, तालीम सहभागी होणार असल्याचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी सांगून, ‘अभी नहीं तो कभी नहीं’ अशा निर्णायक लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.एका व्यासपीठावर याशहरवासीय व महापालिकेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या ग्रामीण नेत्यांनी आमने-सामने यावे, एकाच व्यासपीठावर येऊन आरोप सिद्ध करावे, असे आव्हान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले.