शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीला कवडीचा भाव

By admin | Updated: July 16, 2014 23:45 IST

भूमिपुत्रांना धोका : गगनबावड्याला जमीन एजंटांचा विळखा

चंद्रकात पाटील -  गगनबावडागगनबावडा परिसरात भूमिपुत्रांच्या अज्ञानाचा फायदा घेत कराडो रुपयांचा जमीन व्यवहार करून देणाऱ्या एजंटांंचा सुळसुळाट सुरू आहे. भूमिपुत्रांच्या अज्ञानाचा फायदा घेत करोडो रुपयांच्या जमिनी कवडी मोलाने धनदांडग्यांच्या हवाली होत आहेत. प्राप्त माहितीनुसार या परिसरातील निम्म्यांहून अधिक भूमिपुत्रांनी एजटांना भुलून जमिनी विकल्या आहेत. काही वर्षांत उर्वरित जमिनीही त्यांच्याकडून बळकावल्या जाण्याची शक्यता आहे. परिणामी डोंगर माथ्यावरील भूमिपुत्रच येथे भूमिहीन होणार आहेत. कोल्हापूर शहरापासून ३५-४० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पर्यटन स्थळ परिसरात काही वर्षांपूर्वी केवळ हौस म्हणून काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जमिनी खरेदी केल्या. हा व्यवहार त्यावेळी हजोरांच्या घरात झाला. दळणवळणाच्या सुविधा आणि भविष्यात दगडधोंड्याच्या जमिनीला सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळणार या अपेक्षेने अनेकांच्या नजरा या जमिनीकडे वळल्या.पैसेवाल्यांनी थेट डोंगर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मोलमजुरी आणि जमिनीतील सुके गवत विकून जगणारा भूमिपुत्र मालामाल होऊ लागला. ठरावीक जणांच्या खिशात पैसा खेळू लागल्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारले. जमिनीच्या विक्रीचा हळूहळू धंदा झाला. शहरात जाऊन थोडेफार शहाणे आणि व्यवहार ज्ञान असणाऱ्या जाणकारांनी मोर्चा गावाकडे वळविला आणि एजंटांचा उदय झाला. गगनबावडा, असळज, बोरबेट, कोदे, अणदूर रस्त्यावर एखादी आलिशान गाडी उभी राहिली की, या एजटांनी त्यांना गाठलेच. दोघांतील चर्चेतून जागा पाहिजे म्हटल्यावर गरजू शेतमालकांच्या परस्पर जमिनी दाखवून सौदा ठरू लागला. हा सौदा मोठ्या किमतीला ठरवून मग ही मंडळी त्यांच्या गाडीतून मूळ शेतमालकांच्या घरी जातात. मोठे सायब हायती, तुमची जमीन त्यांना पसंद पडलिया तवा तुम्ही काय करणार? चांगला भाव मिळतोय देऊन टाका. तुमच्या अडी-अडचणीला ते मदत करतील, यासह त्यांच्या घरातील समस्या, कठीण प्रसंग सांगून त्याला हे दलाल दररोज भेटून बेजार करून सोडतात. अखेरीस शेतमालकाला पटवून सौदा पक्का केला जातो आणि जमिनीची विक्री होते. यामध्ये दलाल दोन्हींकडून दलाली पदरात पाडून घेतात. दलालीत रग्गड पैसा मिळू लागल्यावर कोणाची जमीन द्यायची याचा शोध घेऊन त्याची परस्पर किंमत ठरवून बाहेर चढ्या दराने विकण्याचा फंदा दलालांनी शोधला आहे.