शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात लॉकडाऊन काळातही पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण कमी असले तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६३ असून ...

आजरा :

आजरा तालुक्यात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण कमी असले तरी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६३ असून निगेटिव्ह रुग्ण २७६८ इतके आहेत. दीड महिन्यात कोरनाने तालुक्यातील ५१ जणांचा बळी गेला असून ही बाब चिंताजनक आहे. गेले आठ दिवस कडक लॉकडाऊन असतानाही पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही. उद्यापासून लॉकडाऊन शिथील केल्यामुळे बाजारपेठेला गर्दीचे स्वरूप येऊन पुन्हा कोरोना आणखी वाढण्याची भीती आहे.

तालुक्यात १ एप्रिलपासून ४२८३ नागरिकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर व रॅपिड अ‍ॅंटिजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी ४१०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १७४ जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. आजपर्यंत तालुक्यात १३४१ रुग्ण पॉझिटिव्ह असून २७६८ जण निगेटिव्ह आहेत. ५१ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या तालुक्यात ३६३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून आजरा कोविड सेंटरमध्ये ९२, सीपीआर कोल्हापूर २, खासगी हॉस्पिटल १८, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज १७, रोझरी कोविड सेंटर २२, मुकुंददादा आपटे फाऊंडेशन मुमेवाडी कोविड सेंटरमध्ये ३०, घरी उपचार घेणारे १७९ रुग्ण आहेत.

आजपर्यंत ९२७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. २३ मे रोजी तालुक्यात सोहाळे-बाची २, उत्तूर २, सरोळी ३, आजरा २, वझरे १, बुरुडे १, असे ११ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

गेले आठ दिवस तालुक्यात कडक लॉकडाऊन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी नागरिकांनी घरीच राहून कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यातच उद्यापासून लॉकडाऊन शिथील होणार असल्याने बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाची भीती चिंताजनक आहे.