शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगासाठी सकारात्मक निर्णय होईल

By admin | Updated: July 31, 2016 00:45 IST

सुरेश हाळवणकर : वस्त्रोद्योगातील मंत्री, आमदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटणार

इचलकरंजी : यंत्रमाग महामंडळामार्फत शासनाने दोन हजार यंत्रमागांना बिमे द्यावीत, साध्या यंत्रमाग कारखानदारांसाठी विजेच्या दरात सवलत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच यंत्रमाग उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली असून, मंगळवारी त्यावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. तसेच मंदीच्या काळात ट्रेडिंगधारकांनी माणुसकीच्या नात्याने एकमेकांना आधार देण्याच्या उद्देशाने यंत्रमागधारकांना किमान एक पाळी चालावी यासाठी बिमे द्यावीत, असे आवाहनही ट्रेडिंगधारकांना केले. वस्त्रोद्योगची स्थिती बिकट बनल्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील प्रांत कार्यालय चौकात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनस्थळी हाळवणकर यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखानदारांच्या समस्यांबाबत चर्चा केली आणि नेहमीच तेजी-मंदीचा सामना करणाऱ्या या उद्योगात येथील उद्योजकांनी अनेक चढ-उतार सहन केले आहेत. त्यातूनही येथील उद्योग स्थिर होऊन तो वाढत गेला आहे. त्यामुळे कारखानदारांनी खचून न जाता या जागतिक मंदीचा सामना करावा, असे आवाहनही केले. तसेच लवकरच वस्त्रोद्योग मंत्री आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील आमदार यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन शासनाकडून कापूस खरेदी करून तो सूतगिरण्यांना देऊन त्या सूतगिरण्यांमार्फत काही टक्के सूत थेट कारखानदारांना विक्री करण्याची मागणी करणार असल्याचेही सांगितले. (वार्ताहर) राजकारण बाजूला ठेवावे आपल्या शहरातील उद्योगात राजकारण शिरतंय मालेगाव, भिवंडीसह यंत्रमाग क्षेत्रातील सर्वच ठिकाणी मंदीचे सावट पसरले आहे. मात्र, आपल्या शहरातील या उद्योगात राजकारण शिरल्याने येथील कारखानदारांना नुकसानीचा जास्तच त्रास होत आहे. त्यामुळे उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवावे, असा टोलाही आमदार हाळवणकर यांनी यावेळी लगावला.