शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

जनजागृतीमुळे वाढतोय चिमण्यांचा अधिवास

By admin | Updated: March 19, 2017 18:04 IST

जागतिक चिमणी दिन : पाणी, झाडे, घरट्यांमुळे बदलतेय चित्र

आॅनलाईन लोकमतसंदीप आडनाईक/कोल्हापूर : शहरीकरण वाढतच असल्यामुळे विविध प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे चित्र असतानाच पर्यावरणप्रेमी आणि पक्षीमित्रांबरोबरच सामान्यांमध्ये वाढणाऱ्या जनजागृतीमुळे चिमण्यांची संख्या वाढण्यास मदत होत आहे, असे आशादायक चित्र आहे.जागतिक चिमणी दिन म्हणून २० मार्च हा दिवस साजरा केला जातो. सर्वत्र सामान्यत: आढळणारी चिमणी म्हणजेच इंडियन कॉमन स्प्रॅरो. या चिमणीचे दर्शन दुर्मीळ होत असल्यामुळे नाशिकच्या नेचर फॉरेव्हर सोसायटी या संस्थेतर्फे भारतातही २0१0 पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरवात झाली. यंदा या संस्थेतर्फे मुंबईचे वकील आफरोज शाह, पुण्याचे कर्नल अश्विन बार्इंदर आणि मुंबईतील ग्रीन सोसायटी या संस्थेला फेचर फॉरेव्हर सोसायटी स्पॅरो अ‍ॅवार्ड या आठवड्यात दिला जात आहे. जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याचा संकल्पनेला पहिल्याच वर्षी जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. चिमण्या खरेच गायब झाल्या आहेत, याचे भान शहरवासीयांना यायला सुरवात झाली. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमाने मोठी जनजागृती झाली आहे.पर्यावरणप्रेमी संस्थेकडून घरी, आॅफिसमध्ये, मिळेल तेथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चिमण्यांच्या कहाण्या, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रमातून जागतिक चिमणी दिवस साजरे करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय चिमण्यांना आकर्षित करणारी झाडे लावणे, कृत्रिम घरटी तयार करणे, त्यांच्यासाठी पाणी ठेवणे अशा उपक्रमात कोल्हापुरातील लोकांचा वाटा मोठा आहे.दिसली चिमणी की छायाचित्र करा अपलोड...यंदा प्रथमच जगभरात किती चिमण्या आहेत, याची प्रगणना सुरु करण्यात आली आहे. २0 मार्चपर्र्यत नेचर फॉरेव्हर सोसायटीच्या संकेतस्थळावर प्रत्येकाने मिळेल त्या चिमणीचे छायाचित्र, तुम्हाला आढळलेल्या ठिकाणाच्या उल्लेखासह अपलोड करण्याचे काम सुरु झाले आहे. याला प्रतिसाद मिळत आहे.बांधकाम व्यावसायिकांनो, चिमण्यांनाही द्या जागा... चिमण्या वाचविण्यासाठी फ्लॅट, घराच्या टेरेसवर, खिडकीत चिमण्यांसाठी दाणा-पाणी ठेवा, घरात काही वस्तूंची (बूट, चप्पल इत्यादी) रिकामी खोकी पडलेली असतात. त्यांना चिमण्या आत जाईल, असे छिद्र पाडून, घराबाहेर खिडकीच्यावर उंच जागेवर टांगा, तेथे चिमण्या घरटे करतील, तसेच शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांपासून त्यांना खाद्य भरवायचे फिडर बनवू शकता, बांधकाम व्यावसायिकांनी बंगल्यांचे बांधकाम करतानाच चिमण्यांसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवू शकतात. हे आहेत, कोल्हापुरातील पक्षीप्रेमी...निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, बंडा पेडणेकर, अ‍ॅड. केदार मुनीश्वर, मिलिंद यादव, सुहास वायंगणकर, फारुख म्हेतर, रमण कुलकर्णी, विजय टिपुगडे यासारखे पक्षीमित्र सातत्याने निसर्गमित्र संस्था, ग्रीन गार्ड, कला साधना मंच यासारख्या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरात पक्षी वाचविण्यासाठी विविध उपक्रम घेत असतात.

अनिल चौगुले : पर्यावरणाशी संबंधित सर्वच चळवळीत अग्रेसर असणारे निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले पक्षी वाचवा मोहिमेत प्रॅक्टिकली काम करत असतात. गतवर्षी कुंभारांकडून जाणीवपूर्वक खास वेगळ्या आकाराचे २000 माठ बनवून त्याचे वितरण त्यांनी केले. यातून चिमण्यांना अधिवास आणि पाणी मिळेल अशी व्यवस्था केली होती. शेवगा, कडीपत्ता, फुलं येणाऱ्या रोपांची जाणीवपूर्वक लागवड करण्यात आली. यंदाही नारळीच्या शेंड्यापासून चोथा बनवून त्याचे महिलावर्गात वितरण करण्याचा कार्यक्रम येत्या बुधवारी सायंकाळी ४ वाजता शाहुपुरी येथील पंचमुखी गणेश मंदिर हॉलमध्ये होणार आहे. भांडी घासताना अ‍ॅल्युमिनियमचा चोथा वापरल्याने त्यातील अडकलेल्या अन्नकणांकडे आकर्षित होणाऱ्या चिमण्यांना त्यातील तारांमुळे दुखापत होते. हे लक्षात घेउन हा उपक्रम आयोजित केला आहे.

विजय टिपुगडे : इतर उपक्रमासोबत चिमण्या वाचविण्याच्या मोहिमेत कलासाधना मंचचे विजय टिपुगडे सहभागी आहेत. आपल्या कॅमेऱ्यातून बंदिस्त केलेल्या चिमण्यांचे प्रदर्शन भरवून त्यांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. त्यांच्या चिमण्यांवरील चित्रांचे पहिले छायाचित्र प्रदर्शन १५ जुलै २0१२ रोजी शाहू स्मारक भवन येथे भरले होते. त्यानंतर त्यांचे राज्य भरात आणखी दहा ठिकाणी प्रदर्शन भरलेले आहे.

मिलिंद यादव : चिमण्यांसह पक्ष्यांबाबत चिल्लर पार्टीमध्ये जनजागृती करण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न करणारा कार्यकर्ता. मुलांना ठराविक पक्षीच माहित असतात, पण त्यांची नावे माहित नसतात. ती माहिती करुन देण्यासाठी हिवाळ्यात रंकाळ्यासह इतर पाणवठ्याच्या जागेवर विद्यार्थ्यांची सहल काढली जाते. यातून काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चिमणीची घरटी असणारी झाडे तोडू दिली नाहीत, शिवाय पिलांनाही संरक्षण देण्याचा प्रयत्न केला.