शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडच्या शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

By admin | Updated: December 10, 2015 00:56 IST

१६५ ठिकाणी जमीन भूसंपादनासाठी आरक्षण : नगरविकास खात्याच्या नोटिसीची होळी

मुरगूड : नगर विकास खात्याने मुरगूड (ता. कागल) शहराच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये १६५ ठिकाणी विविध कारणांसाठी जमीन भूसंपादनासाठी आरक्षण टाकले आहे. या आरक्षणाला तीव्र विरोध करीत हरकतीच्या सुनावणीसाठी पाठविलेल्या शासनाच्या नोटिसीची संतप्त शेतकऱ्यांनी नगरपालिकेसमोरच होळी केली. शासनाने आपल्या भावना लक्षात घेतल्या नाही तर १६५ शेतकरी नगरपालिकेच्या समोर सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तणावपूर्ण वातावरणात हरकतीवरील सुनावणी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये पार पडली. मुरगूड शहराच्या विकासाच्या दृष्टीने भविष्यात होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अंदाज घेऊन क्रीडांगण, प्राथमिक शाळा, शॉपिंग सेंटर, बगीचा, पाण्याची टाकी, जिम्नॅशिअम हॉल व अंतर्गत रस्ते, आदींसाठी १६५ शेतकऱ्यांच्या अंदाजे ३० ते ३५ एकर बागायत शेतीवरच नगरविकास खात्याने आरक्षण टाकलेले आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनाला, भूखंडधारकाला अंधारात ठेवून आरक्षणे टाकली आहेत. जर यामध्ये जमिनी गेल्या तर बरेच शेतकरी भूमिहीन होतील, असा आक्षेप घेत विकास आराखडा व आरक्षणाला भूखंडधारक व नगरपालिका प्रशासनाने विरोध केला आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगरविकास खात्यामार्फत बुधवारी पालिकेच्या सभागृहात हरकती पार पडल्या. यासाठी पुणे नगररचना विभागाचे सहसंचालक पी. जी. भुक्ते, कोल्हापूर नगररचना विभागाचे सहायक संचालक एस. एन. चव्हाण, सहायक नगररचनाकार कुलकर्णी, के. वाय. पाटील, के. पी. यादव, पासळकर यांचे पथक आले होते. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सुरुवातीलाच हरकतींवरील सुनावणीसाठी पाठवलेल्या नोटिसीची पालिकेसमोर होळी करीत शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी शंखध्वनी केला. यावेळी माजी नगरसेवक एम. डी. रावण यांनी आरक्षणे चुकीची असल्याबाबत पुरावे दाखल केले. संजय भारमल म्हणाले, शहराचा विकास करीत असताना नापीक व पडीक जमिनीचाच वापर करावा, असे शासनाने सांगितले असताना त्याला हरताळ फासण्याचे काम मुरगूड आरक्षणामुळे झाले आहे. न्याय मिळाला नाही तर कायदेशीर आंदोलन लढण्याचा इरादा स्पष्ट केला. यावेळी विशाल सूर्यवंशी, विनायक रामले, विलासराव सूर्यवंशी, इस्माईल नायकवडी, उदय शहा, संदीप सूर्यवंशी उपस्थित होते. मागणीचे निवेदन नगररचना सहसंचालक पी. जी. भुक्ते यांना दिले. (वार्ताहर)नगरपालिकेचा विरोध : शेतकऱ्यांनी घाबरू नयेनगरविकास खात्याकडून विकास आराखडा तयार करताना पालिका प्रशासनाला अंधारात ठेवले आहे. या आरक्षणाला आमचाही विरोध असून, या आरक्षणामुळे काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधाचा ठरावही संमत करणार आहोत.- प्रवीणसिंह पाटील, सभागृह नेता, मुरगूड नगरपरिषदआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना धीर देत सहसंचालक पी. जी. भुक्ते यांनी सांगितले की, आपण घाबरून जाऊ नका. तुम्हाला डावलून शासन कोणताच निर्णय घेणार नाही. आपल्या संतप्त भावना मी वरिष्ठांना कळविणार असून, कोणाचेही नुकसान होणार नाही.