शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची महात्रिपूरसुंदरी रूपात पूजा

By admin | Updated: October 8, 2016 01:25 IST

नवरात्रौत्सवाची सातवी माळ : भाविकांची अलोट गर्दी; तुळजाभवानी देवीची दीपपूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महात्रिपूरसुंदरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री देवीची पालखी बालाजी मंदिराच्या शिखराच्या आकारात काढण्यात आली; तर जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची दीपपूजा साकारण्यात आली. देवीच्या तांत्रिक दशमहाविद्यांपैकी सर्वांत लोकप्रिय देवता म्हणजे त्रिपूरसुंदरी. हे महात्रिपूरसुंदरी स्वरूप सर्वसंप्रदायसमावेशक आहे. या स्वरूपात देवी महात्रिपूरसुंदरी ही पंचप्रेतासनास्था अथवा पंचब्रह्मासनास्था अशी कल्पिली जाते. त्रिपूरसुंदरी चतुर्भुज असून, प्रदक्षिणाक्रमाने पुष्पबाण (गुच्छ), अंकुश, पाश, इक्षुदंड (उसाचा धनुष्य) धारण केले आहे. बऱ्याचदा देवीच्या खांद्यावर अथवा पुष्पगुच्छावर पोपट दाखविला जातो. त्रिपूरसुंदरीच्या उपासनेमध्ये शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य सर्वांचा समन्वय साधल्याने या देवीच्या उपासनेला व्यापकत्व प्राप्त झाले आहे. ही पूजा संजीव मुनीश्वर, आशुतोष जोशी, सुशील कुलकर्णी यांनी बांधली. दरम्यान, दिवसभरात गण गण गणात दत्त माउली महिला सांस्कृतिक मंडळ, अक्कमहादेवी भजनी मंडळ, जिव्हाई महिला सोंगी भजनी मंडळ, आशीर्वाद प्रस्तुत ‘स्वरसौरभ’तर्फे भावगीते भक्तिगीते; राधिका कालेकर ग्रुपतर्फे पोवाडा, भारूड, जोगवा, ‘स्वरनिनाद’ प्रस्तुत ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ या संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रात्री अंबाबाईची पालखी बालाजी मंदिराच्या शिखराच्या आकारात काढण्यात आली. खासदार धनंजय महाडिक, अरुंधती महाडिक, आमदार अमल महाडिक, समीर शेठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. सुवर्णपालखी दर्शनासाठीकरवीर निवासिनी श्री अंबाबाईसाठी सोन्याची पालखी बनविण्यात येत आहे. या पालखीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, शुक्रवारी ही पालखी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजता अरुंधती महाडिक यांनी पालखीचे पूजन केले. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक, भरत ओसवाल यांच्या उपस्थितीत ही पालखी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात त्या व्यासपीठावर भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली. यावेळी खासदार महाडिक यांनी सुवर्णपालखीमागील भावना व्यक्त केल्या. शालू अर्पण शुक्रवारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात तिरूमला तिरूपती देवस्थानकडून अंबाबाईला मानाचा शालू अर्पण केला. गुलाबी रंगाच्या शालूवर सोनेरी रंगाच्या कोयऱ्या असून, त्याची किंमत ८९ हजार २०० रुपये आहे. तिरूपती देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी व्ही. दामोदरम व त्यांच्या पत्नी प्रेमलता यांनी हा शालू व खण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला.