शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फोडणी महागली; भाजीपाला आवाक्यात

By admin | Updated: August 22, 2016 00:29 IST

बाजारभाव : तूरडाळीची घसरण सुरू

कोल्हापूर : तेलाची मागणी वाढल्याने ऐन सणात किलोमागे दोन रुपयांची वाढ झाल्याने तेलाने ग्राहकांचा चांगलाच झटका दिला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्याने दर कमालीचे कमी झाले आहेत. तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून किलोमागे तब्बल दहा रुपयांनी दर कमी झाला आहे. फळबाजारातील आवक व मागणी सारखीच असल्याने फारशी चढउतार दिसत नाही. साखर ४० रुपयांवर स्थिर राहिली आहे. हरभराडाळ, मूग, मूगडाळ, मटकीच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. शाबूची मागणी वाढली असली तरी ६० रुपयांवर स्थिर राहिली आहे. तूरडाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून किरकोळ बाजारात १४० रुपयांपर्यंत डाळ आली आहे. भाजीपाला बाजारात फळे व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोबी, टोमॅटो, श्रावण घेवडा, ढबू, गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडका या भाज्यांच्या दरांत घसरण झाली आहे. वांग्यांचे दर मात्र स्थिर असून पांढरी वांगी ४० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. कोंथिबिरीची आवक वाढूनही दर तेजीत आहेत. गूळ ५५ रुपयांवर! किरकोळ बाजारात गुळाचा दर ५५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ऐन गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गुळाची मागणी अधिक असते. मागणी वाढण्यापूर्वीच गूळ भडकल्याने ऐन सणात गुळाचा साठ रुपयांचा टप्पा पार होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कांदा-बटाटा स्थिर गत आठवड्याच्या तुलनेत कांदा व बटाट्याच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा साडेसात, बटाटा १८, तर लसूण ९० रुपये प्रतिकिलो असा दर आहे. घाऊक बाजारातील प्रमुख भाज्यांचे प्रतिकिलोचे दर असे कोबी- ६, वांगी- ३०, टोमॅटो- ८, ढबू- ३०, घेवडा- १२, गवार- १८, ओला वाटाणा- ५५, कारली- ३५, वरणा- २२, दोडका- १५. झोपडपट्टीवासीयांसाठी ‘पंतप्रधान आवास’चा प्रस्ताव इचलकरंजी नगरपालिका : लाभार्थ्यांची बैठक घेणार - सदा मलाबादे इचलकरंजी : शहरामधील नेहरूनगर झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांसाठी नगरपालिकेकडे निधी उपलब्ध नसल्याने त्यांचा समावेश पंतप्रधान आवास योजनेत करण्यात यावा, अशा आशयाचा प्रस्ताव नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी लालबावटा झोपडपट्टी संघटनेसमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव नेहरूनरमधील लाभार्थ्यांसमोर ठेवून त्यांची बैठक घेण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे यांनी यावेळी सांगितले. नेहरूनगर झोपडपट्टीमध्ये सुमारे ६३६ झोपड्या आहेत. त्यापैकी ४४४ लाभार्थ्यांनी अपार्टमेंट पद्धतीने घरकुले मिळावीत, यासाठी त्यांच्या हिश्श्याची रक्कम नगरपालिकेकडे जमा केली आहे. त्यापैकी फक्त ४८ घरकुले असणारी एकच इमारत बांधून तयार झाली आहे. परिणामी राजकीयदृष्ट्या रखडलेल्या या घरकुलांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. लाभार्थी मात्र घरकुलांसाठी झोपडपट्टीची जागा रिकामी करून अन्यत्र भाड्याने राहत आहेत. तरी लाभार्थ्यांना तातडीने घरकुले बांधून द्यावीत; अन्यथा लालबावटा झोपडपट्टी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला. याबाबत नगराध्यक्षा बिरंजे, मुख्याधिकारी डॉ. रसाळ, संघटनेचे अध्यक्ष सदा मलाबादे, शिवगोंड खोत, नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, अभियंता संजय बागडे, आदींची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत घरकुलांसाठी आवश्यक असलेला ७ कोटी ६० लाखांचा वाढीव निधी पालिकेकडे उपलब्ध नाही, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिली. त्यामुळे लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये सहभागी व्हावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यावर बोलताना मलाबादे यांनी सर्व लाभार्थी झोपडपट्टीवासीयांची बैठक घेऊन या बैठकीत या नव्या प्रस्तावाबाबत विचार करण्यात येईल, असे सांगितले.