शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घालमेल नेत्यांची; चैनी झाली मात्र मतदारांची

By admin | Updated: December 29, 2015 01:02 IST

विधान परिषदेची ‘शाही सहल’: सहलीत घडले गमतीदार किस्से, काहींनी अनुभवला विमान प्रवास

कोल्हापूर : विधान परिषद निवडणूक ही नेत्यांची झाली असली तरीही चैनी मात्र मतदारांची झाली. दोन्हीही उमेदवारांकडून शाही सहली झाल्या; पण यामध्ये अनेकांचा थ्री, फाईव्ह स्टार हॉटेलचा आस्वाद आणि विमान प्रवासाचा पहिलाच योग असल्याने मतदार व त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद प्रमाणापेक्षा अधिक दिसून आला. फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नाष्टा करताना ‘अहो, माझी चटणी संपली, आणखी आणा हो’ असे जोरात ओरडून काही नगरसेविकांनी मागणी केल्याचे अनेक गंमतीदार किस्सेही घडले. या सहलीवरील मतदारांनी केलेल्या खरेदीचाही सर्व खर्च उमेदवारांवरच पडत असल्याने मतदारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी रग्गड खरेदी करून घेतली. या सहलीची चर्चा चांगलीच रंगली होती. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध अपक्ष महादेवराव महाडिक यांच्यात काट्याची लढत झाली. दोन्हीही उमेदवारांनी मतदार फुटाफुटीचे राजकारण होऊ नये म्हणून मतदारांना सहकुटुंब शाही सहली घडविल्या. या सहलीमध्ये केरळ-बंगलोर तसेच म्हैसूर-उटी अशा सहली झाल्या. मतदारांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा सहलीतच ठेवली होती. विशेष दक्षता म्हणून सर्व मतदार आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून मोबाईल काढून घेतले होते. एकाने विमान प्रवासासह दोन-दोन वातानुकुलित व्होल्वो ठेवल्या होत्या. यापैकी एका बसस्थानक परिसरातील दोन महिला नगरसेवकांनी आणि पूर्वभागातील नगरसेविका या तिघींनी ग्रुप करून सहलीत अनेक ठिकाणी रस्त्यावर व्होल्वो बस थांबवून दिसेल त्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला. पहिलाच अलिशान प्रवास असल्याने त्याच्या गोंधळामुळे बसमधील मतदार त्रस्त बनले होते तर या तिघींनी खाद्यपदार्थ, शीतपेयाचा प्रमाणापेक्षा जादाच स्वाद घेतल्याने त्याचा कचरा बसभर झाला होता. या तिघींच्या गट्टीने अनेक हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांवरून वाद केल्याचीही चर्चा रंगली. सहलीत नगरसेविकांपेक्षा त्यांच्या पतीराजांचाच रूबाब होता. बंगलोरमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तर मतदार व त्यांच्या कुटुंबीयांनी ड्रायक्लिनचा दर पाहिल्यानंतर एका-एका मतदाराने किमान ७-८ कपड्यांचे जोड दिले. याठिकाणचा ड्रायक्लिनचा दर एका कपड्याच्या जोडसाठी किमान २५० रुपये होता. तोही खर्च उमेदवारांनी भागवला. हॉटेलमध्ये नाष्टा करतानाही ‘अहो, माझी चटणी संपली आहे, मला द्या’ असे एका नगरसेविकाने ओरडून मागितल्याने सारेच आवाक् झाले. बंगलोरच्या मॉलमधील खरेदीमुळे बसमध्येच सहित्याची अडचण होऊ लागली होती. (प्रतिनिधी)‘लाडली’चा विमान प्रवासपुण्यातून एका व्होल्वो बसने मतदारांना एकत्रित करून कोल्हापूरला आणले तर मतदारांसोबत आलेल्या सर्व कुटुंबीयांना स्वतंत्र गाडी करून कोल्हापूरला घरी पाठविले. यापैकी एका गट नेत्याच्या पत्नीने कोल्हापूरला येण्यापूर्वी पन्हाळा तालुक्यातील आपल्या माहेरीही गाडी वळविण्यास भाग पाडले. ती गावात पोहोचताच, तिच्या स्वागतासाठी गावकरी हजर होते तर आपली लेक विमान प्रवास करून आल्याचे कौतुक तिच्या आई-वडिलांनी जाहीरपणे केल्याचीही चर्चा महापालिकेत सुरू होती. एकाचा दवाखान्याचा खर्च २२ हजार रुपयेएका जुन्या जाणकार नगरसेवकाने दिसेल त्या पदार्थाचा प्रमाणापेक्षा जादा आस्वाद घेतल्याने तो आजारी पडला. ते पाणी बाधले असे सांगत असले तरी घरातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा घरी येईपर्यंत त्यांच्या दिमतीला मिनरल वॉटर असताना हे पाणी बाधले कसे? असा अनेकांनी त्यांना प्रश्न केला. त्या ज्येष्ठ नगरसेवकांना बंगलोरमधून खास विमानाने पुण्यात आणून त्यांना पुण्यातच बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या रुग्णालयाचा एक दिवसाचा खर्च तब्बल बावीस हजार रुपये झाला. सहलीत हॉटेलमध्ये थांबलेल्या सर्व उमेदवारांचा एकच प्रश्न नेत्यांना असायचा, ‘आमचे काय?’ यातून उमेदवारांनी हा प्रश्न निकालात काढल्यानंतर मतदार खूश झाले. मतदानाला परतत असताना मतदारांनी कुटुंबीयांना पुण्यातून कोल्हापूरपर्यंत ‘खास इनोव्हा’ गाडीने घरी पाठविले. मिळालेली ‘खुशाली’ मात्र त्यांनी कोणताही धोका नको म्हणून पुण्यातून हवाला, कुरिअरमार्फत घरपोच केली.