शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कागलमधील राजकीय समीकरणे बदलणार

By admin | Updated: May 13, 2016 00:52 IST

थेट नगराध्यक्ष निवड : नगरपालिकेत राजे-मुश्रीफ गट सत्तेत; गटांच्या भूमिका महत्त्वपूर्ण

जहॉँगीर शेख -- कागल --जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्याच्या पद्धतीबद्दल राज्य शासन निर्णय घेणार असल्याच्या वृत्ताचे पडसाद सर्वच नगरपालिकांमध्ये पहावयास मिळाले. विशेषत: राजकीय वर्तुळात नवी समीकरणे, आराखडे बांधले जात आहेत. कागल नगरपालिकेत आज राजे-मुश्रीफ गट एकत्रित सत्तेत आहेत. हाच पॅटर्न पुढे चालविला जाणार अशी शक्यता व्यक्त होत होती; मात्र थेट नगराध्यक्षपदाच्या निवडीमुळे कागल पालिका सत्ताधारी गटाची समीकरणे बिघडणार आहेत. २००१ मध्ये अशा पद्धतीने निवडणूक झाली होती. कागल शहरात त्यावेळी राजे विक्रमसिंह घाटगे गटाकडून श्रीमती कांचनमाला घाटगे या उमेदवार होत्या. त्यावेळी मंडलिक-मुश्रीफ एकत्र होते आणि आशाकाकी माने यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला होता, तर सुलोचना साळोखे याही प्रबळ इच्छुक होत्या. या पार्श्वभूमीवर कांचनमाला घाटगे यांनी शोभा पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर नगरपालिकेच्या दोन निवडणुका नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवड पद्धतीने झाल्या आहेत. या दहा वर्षांच्या कालावधीत कागल शहरातील राजकीय घडामोडी वेगाने बदलल्या आहेत. मुश्रीफ गट दहा वर्षे सत्तेत आहे. मंडलिक, संजय घाटगे गटाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सक्रिय झाली आहे. शहरात बऱ्यापैकी ताकद टिकवून असणारा राजे गट गेल्या पाच वर्षांत मुश्रीफ गटाबरोबर आघाडी करून पालिकेत सत्तेत आहे. पाच वर्षांत पदाची वाटणी करून या प्रबळ गटांनी सत्ता राबविली आहे. मात्र, आता थेट शहरातून सर्वच लोक मतदान करून नगराध्यक्ष निवडणार असल्याने आपला उमेदवार ठेवण्याचा आग्रह दोन्ही गटांकडून होणार आहे. नगराध्यक्ष कोणाचा? या मुद्द्यावरूनच सत्ताधारी गटात आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे. कागल शहरावर राजकीय वर्चस्व कोणाचे याचा थेट फैसला या निमित्ताने होणार असल्याने मुश्रीफ गट अथवा राजे गट ही संधी सहजासहजी सोडणार नाहीत. इतर लहानसहान गट या दोन मोठ्या गटांच्या भूमिका बघून मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे थेट नगराध्यक्ष निवडीची पद्धत कागल शहरातील राजकरणात चुरस आणि ईर्ष्या निर्माण करणारी ठरणार आहे. आता अंतिम निर्णय कधी होणार, आरक्षण काय निघणार आणि उमेदवार कोण असणार? यावरही बरेच अवलंबून असल्याने तूर्त केवळ चर्चा सुरू आहेत.