शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाने सहकारी संस्था मोडीत

By admin | Updated: August 10, 2015 00:47 IST

शेखर चरेगावकर : सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक

सांगली : सहकारी संस्थेमध्ये राजकारण शिरले तरच त्या मोडकळीस येतात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे सहकारी संस्था या राजकारणविरहित असायला हव्यात, असे आवाहन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. येथील सांगली अर्बन बँकेच्या सभागृहात रविवारी सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चरेगावकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ होते. प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष संजय बिर्ला, विजय देवांग, संजय धामणगावकर, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. चरेगावकर म्हणाले की, सहकारी संस्थांच्या अनेक अडचणी आपण शासनदरबारी मांडल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सहकारी संस्था, कायद्यात संशोधनाचेही काम सुुरु आहे. सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राज्यातील दीडशे कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी त्यांचे योगदान घेण्यात येईल. राज्यात ५४ विविध प्रकारच्या सहकारी संस्था असून त्यांची संख्या सुमारे २ लाख ३७ हजार इतकी आहे. यामधील सुमारे लाखभर संस्था या कागदोपत्री बंद किंवा कामकाज नसलेल्या संस्था आहेत. यापुढे सर्व संस्थांचा सर्व्हे करण्यात येणार असून, यामध्ये सुरु असलेल्या संस्थांची निश्चित संख्या कळेल. संख्या निश्चित झाल्यास त्यावर शासनाला नियंत्रण करणे शक्य होणार आहे. सहकार परिषद यापुढे शासनाला विविधप्रश्नी शिफारस करणार आहे. गरज भासल्यास नियमात अनेक दुरुस्त्याही सुचविणार आहे. सहकार चळवळ वाढीसाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील. आजच्या बैठकीने गेले दोन दिवस सुरु असलेल्या सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीची समाप्ती झाली. यावेळी विविध सहकारी संस्थांवर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘सॅलरी अर्नर्स’चे अध्यक्ष लालासाहेब खोत, उपाध्यक्ष पी. एन. काळे, शशिकांत राजोबा, सागर चौगुले, संग्रामसिंह पाटील, विद्याताई खेडकर, निळकंठ देवांग, पराग देवपुजारी, महेश हिंगमिरे, वासंती पराडकर, तृप्ती काळे, हणमंतराव पाटील, शिवराम पटवर्धन आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)लाखाहून अधिक संस्था कागदोपत्रीचमहाराष्ट्रात २ लाख ३७ हजार सहकारी संस्था असून, यामधील सुमारे लाखभर संस्था या कागदोपत्रीच आहेत, अशी माहिती राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली. ते म्हणाले की, राज्य शासन आता सर्वच संस्थांचा सर्व्हे करणार आहे. यामध्ये सहकारी संस्थांचे चित्र स्पष्ट होणार आहे. काही संस्था केवळ शासनाचे अनुदान लाटण्यासाठी जिवंत ठेवण्यात आल्या आहे. सर्व्हेमध्ये सहकारी संस्थांचे चित्र स्पष्ट झाल्यास शासनाला यावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. लवकरच राज्यातील सहकारी संस्थांचा सर्व्हे करण्यात येणार आहे.