शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘हाणामारी प्रकरणातील दोन्ही पोलिस निलंबित’

By admin | Updated: January 19, 2017 01:03 IST

विशेष क्राईम ब्रँचची नियुक्ती -संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

सांगली/कोल्हापूर : पोलिस दलात अंतर्गत कुरघोड्या करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुंडगिरी खपवून घेणार नाही. अंकली (ता. मिरज) व उदगाव (ता. शिरोळ) या ठिकाणी हाणामारी करणारे पोलिस कॉन्स्टेबल संतोष पाटील व किरण पुजारी या दोघांना निलंबित केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, या दोन पोलिसांवर बडतर्फीबाबत कायद्यातील तरतुदीची तपासणी सुरू असून, ‘मोक्का’अंतर्गतही कारवाईची टांगती तलवार आहे. मोटार पेटविल्याच्या मोटार पेटविल्याच्या संशयावरून सांगली शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस शिपाई संतोष पाटील व किरण पुजारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. राज्यातील संपूर्ण पोलिस दलात अशाप्रकारे पोलिसांच्यात अंतर्गत कुरघोड्या, वादावादीची खदखद आहे. यासंबंधी आपण काय भूमिका घेणार आहात? या प्रश्नावर नांगरे-पाटील म्हणाले, दोन पोलिसांच्या वादाची ठिणगी भडकून सांगली पोलिस दलातील गटबाजीचे दर्शन झाले, हे खेदजनक आहे. जनतेचे संरक्षण करणारेच हातामध्ये तलवारी घेत असतील, तर गंभीर आहे. पोलिस खात्यात नोकरी करणाऱ्यांना कायदा माहीत असतो. त्यांनी कायद्याने तक्रार द्यायची सोडून थेट हाणामारी करून पोलिस खात्याची बदनामी केली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खात्यात ठेवणे घातक आहे. संबंधित प्रकरणाची मी स्वत: माहिती घेतली आहे. सांगलीच्या पोलिस अधीक्षकांना पोलिस कॉन्स्टेबल संतोष पाटील व किरण पुजारी या दोघांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, बुधवारी सायंकाळी सांगलीत पत्रकारांशी बोलताना नांगरे-पाटील म्हणाले की, या दोन पोलिसांनी मारामारीसाठी गुंडांचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही गटांतील साथीदारांचे पोलिस रेकॉर्ड तपासले जाणार आहे. त्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आल्यास दोन्ही गटांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच या दोन्ही पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याबाबत कायद्यातील तरतुदीची तपासणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) विशेष क्राईम ब्रँचची नियुक्ती परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण पोलिस दलामध्ये अंतर्गत वादावादी असल्याचे लक्षात आले आहे. ही खदखद कोणाकोणांत आहे, अवैध व्यावसायिक, गुन्हेगारांशी कोणाचे लागेबांधे आहेत, याचा गोपनीय तपास करण्यासाठी ‘विशेष क्राईम ब्रॅँच’ची नियुक्ती केली आहे. हे पथक या पाच जिल्ह्यांतील प्रत्येक पोलिस ठाण्याला भेट देऊन माहिती घेईल. त्यानंतर एक-एक दोषी अधिकारी अथवा कर्मचारी खड्यासारखे शोधून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली जाईल.‘एसीपी’ दरबार : पोलिस दलात काम करताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल, कोणी कर्मचारी वरिष्ठांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल, कार्यालयीन कामकाजासंबंधी काही अडचणी असतील, तर असे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात ‘एसीपी’ दरबार भरविणार आहे. संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडीजयसिंगपूर : हाणामारी प्रकरणातील पाच संशयित आरोपींना बुधवारी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कॉन्स्टेबल संतोष हरी पाटील (वय ३३, रा.अब्दुललाट, ता. शिरोळ), सचिन विजय डोंगरे (२५, रा. शंभरफुटी रोड गुलाब कॉलनी सांगली), दत्तात्रय शामराव झांबरे (२०, रा. भोसे, ता. मिरज, जि. सांगली), स्वप्निल ऊर्फ गोट्या प्रकाश कोलप (२५, रा. अंकली, ता. मिरज) व महेश शिवाप्पा नाईक (२५, रा. शंभर फुटी रोड, गुलाब कॉलनी सांगली) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, यातील संशयित आरोपी अरुण हातळगे याच्यावर मिरज मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम करीत आहेत.