शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी तपासामध्ये हात झटकले की टेकले?

By admin | Updated: January 18, 2016 00:33 IST

डॉक्टर कुलकर्णी खून प्रकरण : आज इस्लामपूर बंद; सीआयडीकडे तपास देण्याची मागणी

अशोक पाटील -- इस्लामपूर -डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉ. अरुणा कुलकर्णी यांच्या खुनामागचे मुख्य सूत्रधार मोकाटच असल्याचा दावा काही संघटनांनी केला आहे. पोलिसांची भूमिका पाहता, या तपास प्रकरणात त्यांनी हात झटकले, की टेकले? असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे या खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. यासाठी सोमवार १८ रोजी इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे.डॉ. कुलकर्णी दाम्पत्य खून प्रकरणाला १ महिना लोटला तरी, खुनातील मुख्य सूत्रधार सापडलेले नाहीत, असा संशय काही संघटनांनी व्यक्त केला आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी तपासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे कैफियत मांडली आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा काही संशयितांना ताब्यात घ्यावे लागले. परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणात सध्या पोलिसांनी मौन पाळले असल्याने, त्यांना विविध संघटनांच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.खून प्रकरणातील संशयित तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या तिघांपलीकडे पोलिसांचा तपास सरकलेला नाही. त्यामुळे शहरातील काही संघटनांनी एकत्र येऊन, हा तपास सी.बी.आय.कडे द्यावा अशी मागणी केली आहे. यासाठीच सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. सोमवारी होणाऱ्या बंदला स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवा मंच, एन.एस.यु.आय., वैद्यकीय व्यावसायिक संघटना, आर.पी.आय. यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने लुटले जात आहेत. चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सावकारीतून झालेल्या आत्महत्या हा वाळवा तालुक्याला लागलेला कलंकच मानावा लागेल. तसेच सकाळी फिरावयास गेलेल्या रमेश शेटे या व्यापाऱ्यावर विष प्रयोग करुन त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न याच इस्लामपुरात झाला. याचाही तपास ठप्पच आहे. या प्रकरणावर कोणीही आवाज उठविला नाही. गेल्या दोन महिन्यात गुन्हेगारी फोफावली आहे. या गुन्हेगारीपुढे पोलीस हतबल झाले आहेत. इस्लामपूर बंद ठेवणे हा पर्याय असू शकत नाही. यासाठी इस्लामपूर पोलीस ठाण्यात खमका पोलीस अधिकारी येणेच गरजेचे आहे.वैशाली शिंदेंना हवी बदलीइस्लामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर दोन महिने सर्वकाही आलबेल चालले होते. त्यामुळे शांतता असलेल्या तालुक्यात आपली बदली झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. परंतु गेल्या तीन ते चार महिन्यात वाळवा, शिराळा तालुक्यात गुन्हेगारीने अक्षरश: कळस गाठला आहे. एकापाठोपाठ एक गुन्हे घडत असल्याने आता त्यांना शांत भागात बदली हवी आहे.डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या खुनाची शहरात घडलेली बाब निंदनीय आहे. या घटनेचा पोलिसांकडून योग्य तपास झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध संघटनांनी पुकारलेला बंद हा योग्यच आहे. त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा राहील.- सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष, इस्लामपूर.