शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

(नियोजित) गाडी जपून चालवा, जीवघेणी ८५ ठिकाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

कोल्हापूर : वेगवान वाहतूक, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास होत असल्यामुळे गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ३१३ रस्ते ...

कोल्हापूर : वेगवान वाहतूक, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास होत असल्यामुळे गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ३१३ रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये तब्बल ३३० जणांचे बळी गेले आहेत. यातील सर्वाधिक अपघातांच्या घटना या ‘अपघातप्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केलेल्या ८५ जागीच म्हणजे ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणी झाल्या आहेत. २०२० या वर्षात या ब्लॅक स्पॉटवर तब्बल शंभराहून अधिक जणांचे बळी गेल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा समितीच्या निरीक्षणातून जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रे निश्चित केलेली आहेत. या ‘ब्लॅक स्पॉट’वर दर तीन वर्षांनी अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. यामध्ये रंबलिंग स्ट्रीप बसवणे, दिशादर्शक फलक बसवणे, थर्मोप्लास्टिक रंगाचे पट्टे मारणे, सावधानता फलक, चमकणारे फलक बसवणे, वळण कमी करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी, मयूर पेट्रोलपंप (गोकुळ शिरगाव), सांगली फाटा, नागाव फाटा, वाठार फाटा, किणी टोल नाका, टोप हे ब्लॅक स्पॉट घोषित केले आहेत. त्यापैकी उपाययोजना केल्यानंतर फक्त टोप येथील एकमेव ब्लॅक स्पॉट शिल्लक राहिल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही ३२ ब्लॅक स्पॉट असून उपाययोजनांनंतर ते कमी करण्याचे प्रयत्न केले आहेत. कोल्हापूर शहरात तब्बल १३ ठिकाणे नोंद आहेत.

शंभरहून अधिक बळी

जिल्ह्यातील सुमारे ८५ ब्लॅक स्पॉट असून गेल्या वर्षभरात या ठिकाणी लहान-मोठे असे सुमारे दोनशेहून अधिक अपघात घडले. त्यामध्ये शंभरहून अधिक जणांचे बळी गेले. राज्य महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवरही मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी आहे. विविध उपाययोजनांचे फलक लावूनही त्याकडे दुर्लक्ष करत चालक सुसाट वेगाने वाहने चालवतात, त्यानंतर अपघात घडतात. राष्ट्रीय महामार्गावर शक्यतो पहाटेच्या वेळेतच अपघात घडल्याच्या अनेक घटना आहेत.

तालुकानिहाय ब्लॅक स्पॉटची संख्या...

करवीर-४

शिरोळ- २,

हातकणंगले- ६

गगनबावडा- ३

राधानगरी- ५

गडहिंग्लज-४

आजरा -३,

भुदरगड- २,

कागल- ४

पन्हाळा-३

कोल्हापूर शहर-१३

इचलकरंजी शहर-४

जयसिंगपूर शहर- २