शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र आराखडा दोन टप्प्यांत करा

By admin | Updated: February 10, 2016 00:55 IST

मुनगंटीवार यांची सूचना : वार्षिक योजना प्रारूप आराखडा बैठक

कोल्हापूर : अंबाबाई देवस्थानामुळे कोल्हापूरला विशेष महत्त्व असून, कोल्हापूर जिल्ह्याने केलेला अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा पुनश्च दोन टप्प्यांत करण्यात यावा, अशी सूचना वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली.पुण्यातील विधान भवनात पुणे विभागातील जिल्हानिहाय जिल्हा वार्षिक योजनांचा प्रारूप आराखडा २०१६-१७ च्या राज्यस्तरीय बैठकीअंतर्गत आयोजित कोल्हापूर जिल्ह्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, आदी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, ‘कोल्हापूरने केलेल्या अतिरिक्त ९३ कोटी ६० लाखांच्या मागणीबाबत आवश्यक ती तपासणी करून निर्णय घेण्यात येईल. अंबाबाई देवस्थानामुळे कोल्हापूरला विशेष महत्त्व असून कोल्हापूर जिल्ह्याने केलेला अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा पुनश्च दोन टप्प्यांत करण्यात यावा. त्यामध्ये धर्मशाळा, मंदिर परिसराचा पादचारी मार्ग विकास, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणांचा विकास, निर्माल्यापासून खत निर्मिर्तीसाठी संयंत्र बसविणे, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर, आदी बाबींचा विचार करावा. मुनगंटीवार म्हणाले, ‘कोल्हापूर जिल्ह्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न पाहता लोकांना जल शिक्षण देण्याची विशेष आवश्यकता आहे. क्षारपड विकासासाठी सेंद्रिय शेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. वनक्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येईल. आमदार विकास निधीतून खर्च करताना रस्ते, दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रोजगारनिर्मिर्ती करणे आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी उपाययोजनांवर खर्च करावा.’जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कोल्हापूरच्या जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ चे सादरीकरण केले. जिल्हा वार्षिक योजना २१६ कोटी १९ लाख रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपाययोजना १०० कोटी ८१ लाख व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपाय योजनेसाठी एक कोटी ८० लाख ६८ हजार रुपयांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एकूण वार्षिक योजना ३१८ कोटी ८० लाख रुपयांची आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ९३ कोटी ६० लाखांची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके यांनीही विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)३१८.८० कोटींची योजनाकोल्हापूर जिल्ह्याची एकूण वार्षिक योजना ३१८ कोटी ८० लाख रुपयांची आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ९३ कोटी ६० लाखांची अतिरिक्त मागणी केली आहे.