शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

पिकनिक पॉईंट - कोल्हापूर

By admin | Updated: July 7, 2016 09:19 IST

कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर राधानगरी शहर आहे. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा आहे. प्रवासाला १ तास वेळ लागतो.

ऑनलाइन लोकमत

हिरवाईने नटलेला राधानगरी कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर राधानगरी शहर आहे. येथे जाण्यास एस. टी बसेसची भरपूर सुविधा आहे. प्रवासाला १ तास वेळ लागतो. धरणाचा तालुका अशी राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी जलाशय आहेत. राऊतवाडी धबाधब्याबरोबर, रामणवाडी, हसणे, सोळांकूर, गैबी दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते. हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्याचा मनमुराद आनंद घेता येता. घनदाट दाजीपूर अभयारण्याचा परिसर देखील हिरवाईने नटलेला आहे. राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना जंगली प्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ, फुले, आदी पर्यटकांचे लक्ष वेधित आहेत. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉर्इंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या भोजनाची, निवासस्थानाची व्यवस्था आहे. राधानगरीत शासकीय विश्रामगृह आहे. तसेच खासगी हॉटेल्सही आहेत.

भिजायचं तर ‘बर्की’तच!‘बर्की’ हे ठिकाण कोल्हापूरपासून ६0 किलोमीटर अंतरावर आहे. कळे-बाजारभोगाव, करंजफेण मार्गे या ठिकाणी जाता येते. तर मलकापूर-येळवणजुगाई मार्गेही जाता येते. गावाच्या सर्व बाजूंनी उंचच्या उंच पर्वतरांगा असून, पावसाळ्यात हिरवाईचा शालू नेसतात. धबधब्याकडे जाण्यासाठी गावापासून तीन किलोमीटर पुढे पायपीट करावी लागते. धबधबक्याकडे जाताना हिरवे डोंगर, जलाशय, खळखळणारे ओढे, डोलणारी झाडे, फुले, पक्षी, डोंगरातून कोसळणारे प्रवाह अशी निसर्गाची उधळण अनुभवायास मिळते. इथल्या सुंगधी वातावरणाची भूल प्रत्येकाला मोहविते. धबधब्याच्या मार्गावरच आता जलाशय बांधला असून, याठिकाणी बोटिंगची सोय करण्यात आली आहे. २० फूट रुंदीच्या पात्रातून सुमारे ४०० फुटांवरून कोसळतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूला आणखी चार धबधबे आहेत. इथे मुक्कामासाठी सोय नसल्याने एका दिवसाचीच ही सहल करावी. जेवणाची आणि नाष्ट्याची चांगली सोय होते. येथे घरगुती पद्धतीचे चांगले जेवण मिळते. धबधब्याकडे जातानाच एखाद्या घरात जेवणाची आर्डर दिली, तर धबधब्यातून भिजून आल्यावर नाचण्याची भाकरी, झणझणीत भोजनावर ताव मारता येतो.

स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे प्रति महाबळेश्वरमहाराष्ट्र-कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेला चंदगड तालुक्यातील तिलारीनगरनजीक असलेला स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजेच गरिबांचे प्रती महाबळेश्वरच आहे. कोल्हापूरहून जाण्यासाठी १४0 किलोमीटर अंतर आहे. तीन तास वेळ जातो. परिसरात राहण्याची सोय आहे. येथे स्वप्नवेल पॉर्इंटसह पारगड, रातोबा पॉर्इंट, ग्रीन व्हॅली रिसॉर्ट, सर्च पॉर्इंट, मोर्लेचा दुर्गोबा धबधबा आणि तिलारीचा तुडुंब भरलेला जलविद्युत प्रकल्प पर्यटकांना भुरळ घालतोय. पारगडच्या पायथ्यापासून नागमोडी वळणे घेत जाताना जंगली प्राणी, निरनिराळे खेकडे, देवाच्या गायी, थुई-थुई नाचणारे मोर, वानरं, ससे, हत्ती, रानडुकरे, सांबर, गवे व निरनिराळे पक्षी व प्राण्यांचे दर्शन होते. चुकून एखादेवेळी झालेले सूर्यदर्शन, मध्येच येणारे धुके मनाला अल्हाददायक वाटते. येथून दिसणारा गोव्याचा अथांग महासागर व विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते.पारगडबरोबरच तालुक्यातील कलानंदीगड, गंधर्वगड, महिपाळगड, आदी गड पाहिल्यानंतर शिवकालीन इतिहासाची आठवण होते. स्वप्नवेल पॉर्इंट म्हणजे तर महाबळेश्वर आणि आंबोलीतही सृष्टी सौंंदर्य नाही असा निसर्गाचा अद्वितीय खजिना येथे पाहावयास मिळतो. धुक्यांचे पांघरूण व धो-धो कोसळणारा पाऊस आणि रोरावणारा वारा, तिलारी प्रकल्पाच्या कॅनॉलच्या पुलाखालील प्रचंड उंचीवरून कोसळणारा धबधबा, भन्नाट वारा, आठवडा-आठवडा जमिनीवर राहणारं धुकं आणि फेसाळणारे शुभ्र धबधबे येथील निसर्गाचे सोबती आहेत. रस्ते आणि पर्यटनाचा विकास झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. तिलारीनगर आणि बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरील हॉटेलमध्ये सहकुटुंब गावरान जेवणाचा आस्वाद पर्यटकांना मिळत आहे.

 पन्हाळाया पिकनिक पॉइंटला यायचे असे : कोल्हापूर शहरातील टाऊन हॉल उद्यानापासून २२ किलोमीटर इतके पन्हाळगडाचे अंतर आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा बसस्थानकातून दर ४५ मिनिटांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे. त्यासाठी प्रतिमाणसी २६ रुपये तिकीट आहे. शहरातून खासगी वाहन करून गेल्यास एक ते दीड हजार रुपये खर्च येईल. कोल्हापूरमधून अंतर : २३ किलोमीटर व जाण्यासाठी लागणारा वेळ ४० मिनिटे. राहण्याची सोय आहे. गडावर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. एक दिवसात या गडाची सहल करून कोल्हापूर शहरात राहण्यासाठी येणे शक्य आहे.गडाबद्दलची माहिती : पन्हाळगडावरील तबक उद्यान, वीर बाजीप्रभू यांचा पुतळा, अंबारखाना, धर्मकोठी, नायकिणीचा सज्जा, ताराराणी राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, तीन दरवाजा, पांडवदरा, सोमेश्वर तलाव, आदी प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. पन्हाळ्याचा माथा थंडगार वृक्षराजीने बहरलेला असून येथील वातावरण आल्हाददायक असते. सह्णाद्री पर्वताच्या कुशीत माथ्यावर असणाऱ्या गडांपैकी हा एक महत्त्वाचा दुर्ग आहे. कोल्हापूरची गादी स्थापन करणाऱ्या महाराणी ताराराणी यांनी आपली राजधानी काही वर्षे येथेच ठेवली होती.

निसर्गसौंदर्य पर्यटनस्थळ रामतीर्थ ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या अनेक साहित्यकृतींत उल्लेख आलेल्या आजऱ्यापासून दोन कि़मी. अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ या सुप्रसिद्ध ‘क’ वर्ग पर्यटनस्थळी नैसर्गिक सौंदर्याची मुक्त उधळण पाहावयास मिळते. कोल्हापूरपासून १00 किमी, दोन तास प्रवास, एस. टी. महामंडळाच्या बसेस जातात. राहण्याची सोय आहे. हॉटेलची संख्याही मोठी आहे. निधी अपुरा पडल्याने महादेव मंदिरासमोरील बांधकाम, पर्यटकांसाठी रॅम्प व किरकोळ कामे झाली. काही स्थानिक मंडळी लोकवर्गणी जमा करून इतर कामे करीत आहेत.येथे पर्यटकांमध्ये वाढ होत असली, तरीही प्राथमिक सुविधांचा अभावच आहे. यात्री निवासामध्ये पर्यटकांना थांबण्याची सोय करण्यात आली असली, तरी यात्री निवास बंद अवस्थेतच असल्याने अडचणीचे होत आहे. स्वच्छतागृहे वापराअभावी पडून आहेत. येथून पुढे आंबोली/ गोव्याला जाता येते.

केर्ले धबधबा : शाहूवाडीपासून केर्ले अठरा किलोमीटरवर. गावच्या दऱ्यामधील खरब्याचा ओढा दोनशे फुटांवरून कोसळत पुढे तीन टप्प्याने खळाळत झाडीत विसावतो. घनदाट जंगलातून झेपावणारा धबधबा किर्र जंगलाचा थरार उभा करतो. महामागार्पासून अडीच किलोमीटरचा रस्ता केर्ले प्राथमिक शाळेजवळून धबधब्याकडे वळतो. त्यापुढे अर्धाकिलोमीटरची माळरान वाट धबधब्याला भिडते.मानोली धरण व सांडवा धबधबा : आंबा बस थांब्यापासून दोन किलोमीटरवरील विशाळगड मार्गावरून हे धरण नजरेत येते. तिन्ही बाजूच्या वनराजीतून धडाडणारे निर्झर जलाशयाला मिळतात. जलाशय दोन टप्प्यात सांडव्याच्या रूपाने धबधबा बनतो. सांडव्याच्या सुरुवातीला तीनशे फूट सिमेंटच्या कठड्यावरून समांतर फेसाळणारे पाणी काळ्या खडकातून पुढे सरकते. पुढे तो प्रवाह सव्वाशे फूट उंचीच्या चरीतून प्रशस्त डोहात धडकतो. पुढे कडवी नदीचे रूप घेतो. हाकेच्या अंतरावर गावाची वस्ती व लगत हॉटेल सुविधा आहे.आंबाघाट : आंब्यापासून तीन किलोमीटरवरील खिंडीचा प्रवेश विस्तीर्ण कोकण दर्शन घडवितो. मात्र, खिंड व हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या वाटेजवळ दरड पडण्याची भीती राहत असल्याने गायमुख,विसावा पॉर्इंट व चक्रीवळण ही ठिकाणे दरीतून धुक्याची सोबत पुरविणारे पावसाचे तुषार अंगावर घेण्यास वाहनांची रीघ लागते. विशाळगड जंगल सफर : आंबा ते केंबुणेर्वाडी हा दहा किलोमीटरचा जंगलमय घाट प्रवास साहसी थ्रील देतो. कोल्हापूरपासून अंतर ७0 किलोमीटर असून प्रवासाला २ तास लागतात. निवास व जेवणाची चांगली सोय आहे. झाडीतील पाणथळे, वाट अडवणारे गवे, वाऱ्यासोबत पाठशिवण खेळणारे धुके अंगावर घेत कोकण पॉर्इंट व वाघझऱ्यावरचा पाऊस नीरव शांतता व भयान एकांत देतो. या मार्गावर दोन ठिकाणी ओढ्याचे पाणी येते.

निसर्गाचा सौंदर्य अविष्कार : गगनबावडागगनबावडा तालुका म्हटले की, पावसाचे माहेरघर म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. कोल्हापूरमधून ६0 किलोमीटर हे अंतर असून एस. टी. बसेस भरपूर सुविधा आहे. जाण्यासाठी एक तास लागतो. राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. हिरवीगार शाल पांघरूण लांबच लांब पसरलेल्या लहान मोठ्या टेकड्या कोकणातील जीवनाचे दर्शन घडवितात. करूळ व भुईबावडा घाटात पावसाळ्यात उगम पावणारे लहान मोठे धबधबे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हौस भागविण्यास पुरेसे ठरतात. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो. येथील गगनगड न पाहिले तर नवलच. साहसी पर्यटनाचा वर्षा बाज म्हणजे आंबा घाटकोल्हापूर-रत्नागिरीच्या जिल्ह्यांची सीमा सजवलेला तेरा किलोमीटरचा नागमोडी आंबाघाट, आंबा-विशाळगड व केंबुणेर्वाडी ते पावनखिंड हा जंगल नि इतिहासाची साद घालणारी वनराई, केर्लेचा धबधबा, मानोली धरणाच्या सांडव्याने घेतलेले प्रशस्त धबधब्याचे रूप, गेळवडे धरणाचा झाडीत विसावलेला बारा किलोमीटरचा बॅक वॉटर व्हू, बर्की, पांढरेपाणी ही वर्षा पर्यटनाला हाकणारी स्थळे सर्वांनाच भुरळ घालतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून कोल्हापूर,कोकण व पुणे, मुंबई भागातील हौशी मंडळी येथील शहारणारा पाऊस एन्जॉय करण्यास गर्दी करीत आहेत. भर पावसातील पावनखिंडीची वारी तर राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. 

  आणखी वाचा : 

(मुंबईजवळचे पावसाळी पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट्स - पहा नगर जिल्ह्याचे ‘कश्मीर’)

(पिकनिक पॉईंट्स : म्हैसमाळ.. मराठवाड्याचे ‘महाबळेश्वर’)

(पिकनिक पॉईंट : अकोला- आकोट)

(पिकनिक पॉईंट : हाजरा फॉल (गोंदिया))

(नागपूरमधील पिकनिक पॉईंट्स)

(पिकनिक पॉईंट : सौताडा-कपिलधार (बीड))

(पिकनिक पॉईंट - नाशिक)

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •  

 

  •