शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत नगरसेवक’ निवडीचे त्रांगडे

By admin | Updated: January 13, 2016 01:10 IST

महापालिका : संस्था पदाधिकारीची अट; संभ्रमामुळे राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले

कोल्हापूर : महानगरपालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात येऊन दोन महिने होत आले तरी ‘स्वीकृत नगरसेवक’पदाचे त्रांगडे कायम आहे. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी व्यक्ती कोणत्या तरी संस्थेची पदाधिकारी असावी लागते, परंतु कोणत्या संस्थेचे पदाधिकारी असावे याबाबत स्पष्टीकरण न मिळाल्यामुळे ही निवड रखडली आहे. दरम्यान, मनपा नगरसचिव विभागाने राज्य सरकारकडे अधिक स्पष्टीकरण मागविले असून ते येत्या दोन दिवसांत येईल, असे सांगण्यात आले. १५ नोव्हेंबरला महापालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात आले. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडी झाल्या, परंतु स्थायी, परिवहन, महिला व बालकल्याण, प्राथमिक शिक्षण मंडळ आदी समितीचे सदस्य आणि सभापतींच्या निवडी विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेत लटकल्या. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीही त्यात अडकल्या. आता ‘स्वीकृत नगरसेवक’पदाची निवडवगळता अन्य सर्व समित्यांच्या सदस्य निवडीही २० जानेवारीच्या महासभेत होणार आहे; परंतु ‘स्वीकृत नगरसेवक’पदाची निवड ही वादात अडकली आहे. डॉक्टर, वकील, निवृत्त प्राध्यापक किंवा निवृत्त मुख्याध्यापक, निवृत्त मनपा सहायक आयुक्त, उपायुक्त, आयुक्त याव्यतिरिक्त कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी असलेली व्यक्ती या पदासाठी अर्ज करू शकते. महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन ही सर्व प्रक्रिया त्यांना समजावून सांगितली. त्यानंतरही काही शंका गटनेत्यांनी उपस्थित करून लेखी उत्तर मागितले. व्यक्ती कोणत्या संस्थेची पदाधिकारी असावी आणि संबंधित संस्थेचा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या उतारा (पी.टी.आर.) आवश्यक आहे का, असे दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. ‘पीटीआर’बाबत खुलासा करण्यात आला होता, तो मान्यही करण्यात आला होता परंतु बैठकीनंतर भाजप व ताराराणी आघाडीच्या गटनेत्यांनी त्याला हरकत घेतली. त्यामुळे हे त्रांगडे निर्माण झाले आहे. नगरसचिव विभागाने मागवलेले मार्गदर्शनही अद्याप आलेले नाही. त्यामुळे या निवडी सध्या अधांतरीच राहिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)