शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पेठवडगावचे पोलीस निरीक्षक गोकावेवर गुन्हा

By admin | Updated: August 11, 2015 00:59 IST

‘लाचलुचपत’ची कारवाई : २९ टक्के अधिक मालमत्ता

पुणे /पेठवडगाव : पेठवडगावचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार नीळकंठ गोकावे (वय ४७) यांच्यासह दोन पत्नी आणि आई-वडिलांविरुद्ध पुण्यातील वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत गोकावे आणि त्यांच्या कुटुंबीयांची उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा २९ टक्के अधिक मालमत्ता आढळून आली. पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वाहतूक विभागाचे निरीक्षक म्हणून काम करीत असताना गोकावे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू करण्यात आली होती. गोकावे यांनी नोकरीच्या एकूण २१ वर्षांच्या (१९९३ ते २०१४) कालावधीमध्ये एकूण ७४ लाख ४१ हजार ७९३ रुपयांची अधिक मालमत्ता धारण केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. ही बेहिशेबी मालमत्ता धारण करण्यासाठी त्यांची पत्नी जयश्री ऊर्फ नेहा नितीन गोकावे, अनुराधा नितीन गोकावे, वडील नीळकंठ रामचंद्र गोकावे, आई लता नीळकंठ गोकावे (सर्व रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे-माळवाडी) यांनी अपप्रेरणा दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. गोकावे मूळचे सांगली जिल्ह्यातील माधवनगर येथील रविवार पेठेतील राहणारे आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलात असताना गोकावे कायमच वादात राहिले आहेत.(पान १ वरून)त्यांच्या पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर येथील स्थावर आणि जंगम मालमत्तांची झडती लाचलुचपतकडून घ्यायला सुरुवात करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र गायकवाड तपास करीत आहेत.लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली पेठवडगावातील निवासस्थानाची पाहणीपेठवडगाव येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्यामुळे शहर व पोलीस ठाणे हद्दीत खळबळ माजली आहे, तर सोमवारी सकाळी वडगाव येथे ते राहत असलेल्या खोलीची पाहणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने केली. मात्र आक्षेपार्ह काही मिळून आले नाही, असे समजते.४ आॅगस्टला गोकावे यांची वडगाव पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. पहिल्याच दिवसात त्यांनी पोलीस प्रशासनाची झलक नागरिकांना दाखवून दिली. कार्यालयात पोलिसांव्यतिरिक्त अन्य वावर असलेल्या अनेकांची हकालपट्टी केली. पुन्हा दिसल्यास कारवाई करण्याची धमकी दिली होती.शहरात अनेक वर्षांपासून दुचाकी वाहनधारकांची परवाना तपासणी करण्यात आली नव्हती. गोकावे यांनी शहरातील प्रमुख चौकात स्वत: थांबून धडक कारवाई केली. यावेळी तिब्बल सीट, दुचाकी वाहनधारक, महिला वाहनधारक यांच्या वाहनपरवान्याची तपासणी केली. तसेच कॉलेज सुटल्यानंतर रोडरोमिओंना प्रसाद दिला. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना संबंधित पोलिसांना दिल्या होत्या. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. शहरात मारामारीप्रकरणी संशयित हल्लेखोरांनाही तत्काळ अटक केली होती, तर मनपाडळे येथेही बलात्कार प्रकरणातील संशयितास अटक केली होती. या पार्श्वभूमीवर गोकावे यांच्यावर कारवाई झाल्यामुळे शहरात खळबळ माजली आहे.