कोल्हापूर : टोप येथील खणीत शहरातील कचऱ्यापासून प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले घटक (इनर्ट मटेरिअल) टाकण्यास मंगळवारी पुण्यातील हरित लवादाने महापालिकेला सशर्त परवानगी दिली. कसबा बावडा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यानंतरच टोप येथील खणीचा भूमी भरण केंद्र (लँड फिल्ड साईट) म्हणून महापालिकेला वापर करता येईल, अशी अट न्यायाधीश व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने निकालात नमूद केली. टोप येथील खणीचा ‘भूमी भरण क्षेत्र’ म्हणून उपयोग करण्यास टोपसह परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप येथील जागेची अत्यंत गरज आहे. ग्रामस्थांचे आक्षेप कायद्याला धरून नाहीत तसेच आधारहीन असल्याचे महापालिकेने सप्रमाण लवादास पटवून दिले. अंतिम निकाल देताना लवादाने २२ मे २०१५ रोजी दिलेल्या आदेशास अधीन ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप खण महापालिकेला सशर्त परवानगी देत आहे तसेच टोप ग्रामस्थांची याचिका खारीज केल्याची माहिती अॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. याचिका खारीज केल्याची माहिती अॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. निकालातील मुद्देभूमी भरण केंद्र म्हणून टोप खण मनपाच्या ताब्यातखणी भोवती सहा फूट भिंत उभाराकसबा बावडा येथे कचऱ्यावर कालबद्ध मर्यादित प्रक्रिया प्रकल्प उभाराकचऱ्यापासून खत किंवा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करता येतील.जैव वैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रीय निराकरण आवश्यकप्रदूषण मंडळाच्या निकषांप्रमाणेच इनर्ट मटेरिअल खणीत टाकण्यास मुभाइनर्ट मटेरिअलचे शास्त्रीय पद्धतीने निराकरणया मुद्द्यांआधारे २२ मे २०१५ च्या लवादाच्या निकालास अधिन राहून परवानगीशहरात रोज तयार होणाऱ्या १७० टन कचऱ्याचे निराकरण कसे करायचे, हा मनपा समोर मोठा प्रश्न आहे. लवादाच्या निर्णयामुळे ही कोंडी फुटली. झूम प्रकल्प येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पास गती येईल. शास्त्रीय पद्धतीने टोप व राजारामपुरीतील टाकाळा येथील खणीत टाकून त्याचे निराकरण केले जाईल. - डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिकासर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा टोप खण येथे कचरा टाकण्यावरून महापालिका आणि टोप ग्रामस्थ यांच्यातील उद्भवलेल्या प्रश्नावर लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. मात्र, या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा टोप ग्रामस्थांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
टोप खणीत कचरा टाकण्यास परवानगी; हरित लवादाचा निर्णय
By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST