शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’ सभा यापुढे आयुक्तांच्या गैरहजेरीतच

By admin | Updated: July 15, 2017 00:09 IST

‘स्थायी’ सभा यापुढे आयुक्तांच्या गैरहजेरीतच

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आयुक्त सभागृहात आल्याशिवाय स्थायी समितीचे कामकाज होणार नाही, असा निर्धार करीत सभा तहकूब करणाऱ्या स्थायी सभापती आणि सदस्यांना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी चांगलीच चपराक मारीत कायद्याचा बडगा दाखविला. यापुढेही आपण स्थायी समितीच्या सभेला उपस्थित राहणार नाही. माझ्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त ‘प्राधिकृत अधिकारी’ म्हणून सभेचे कामकाज पाहतील, असे पत्र देऊन त्यांच्या उपस्थितीवर पडदा टाकला. मला आवश्यकता वाटेल, त्याचवेळी सभेला येऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेला आयुक्त अभिजित चौधरी गैरहजर राहतात. त्यांच्या वतीने उपस्थित राहणारे अधिकारी सभेतील निर्णयांची अंमलबजावणी करीत नाहीत, म्हणून स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी मागच्या तीन सभा प्रशासनाचा निषेध करीत तहकूब केल्या होत्या. एवढेच नाही तर आयुक्त आल्याशिवाय सभाच घेणार नाही, असा निर्धारही केला होता. स्थायी समिती आणि आयुक्त यांच्यात त्यावरून प्रतिष्ठेचा विषय झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘स्थायी’ची सभा झाली. आयुक्त चौधरी या सभेस उपस्थित राहिले. त्यामुळे सभेचे कामकाजही सुरळीत सुरू झाले; परंतु आयुक्तांनी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे एक पत्र दिले आणि ते सभागृहात वाचण्यास सांगितले. येथून पुढच्या सभेला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, प्रकरण ३ चे नियम ५ नुसार अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांना स्थायी समितीच्या सभेसाठी प्राधिकृत करीत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे ‘तुम्ही कितीही गहजब निर्माण केला तरीही मी सभेला येणार नाही. ज्यावेळी मला आवश्यकता वाटेल, त्याच वेळी मी सभेला उपस्थित राहीन,’ अशीच काहीशी ताठर भूमिका आयुक्तांनी घेतल्याचे स्पष्ट झाले. प्रशासन-लोकप्रतिनिधींत तणावाची शक्यतास्थायी समितीच्या सभेत बऱ्याच वेळा आर्थिक निर्णय घेतले जातात. तरीही आयुक्तांनी सभांना उपस्थित राहावे, असे कायदेशीर बंधन नसले तरीही काही वेळा केवळ संकेत म्हणून ते उपस्थित राहत होते. यापूर्वीचे आयुक्तही सभांना उपस्थित राहात होते; अपवादात्मक स्थितीतच ते अधिकारी प्राधिकृत करीत असत; पण चौधरी यांनी ‘येणार नाही’ असे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले. त्यामुळे भविष्यकाळात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात तणाव वाढतो की कमी होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.