शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण भागातील ‘पावणेर’ पद्धत कालबाह्य होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST

संजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क देवाळे वार्ताहर ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतीसह व घरबांधणीतील महत्त्वाची प्राथमिक कामे परस्परांच्या सहकार्याने ...

संजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क देवाळे वार्ताहर

ग्रामीण भागात प्रामुख्याने शेतीसह व घरबांधणीतील महत्त्वाची प्राथमिक कामे परस्परांच्या सहकार्याने करून घेण्याची ‘पावणेर’ पद्धत कालबाह्य होत आहे. त्यामुळे भविष्यात‘पावणेर’ शब्दाचा अर्थ शब्दकोशातच शोधावा लागण्याची शक्यता आहे.

कष्टाची, वेळखाऊ कामे कमी वेळेत पूर्ण करण्याचा ‘रामबाण’ उपाययोजना म्हणून शेतकरी पावणेरकडे पाहत, पण अलीकडच्या काही वर्षांत उसाला मिळालेला किफायतशीर दर, दुग्ध व्यवसाय, अन्य क्षेत्रांत मिळालेल्या रोजगाराच्या संधी त्यातून आलेली आर्थिक सुबत्ता व शिक्षणाने सुधारलेली तरुण पिढी आदी कारणांमुळे एकत्र येऊन ‘पावणेर’ने केल्या जाणाऱ्या सामुदायिक कामांचा ट्रेंड बदलला आहे. त्यामुळेच ही पद्धत कालबाह्य ठरत आहे.

ग्रामीण भागात शेतीची नांगरट तसेच मशागत, बांध-बंदिस्ती, शेतात शेणखत पसरणे शिवाय ऊस लागणीपासून विविध पिकांची पेरणी करणे, उसाच्या मोळ्या बाहेर काढणे, खोडवा पिकाला पहारीने खते देणे, डोंगरी गवत आणणे तसेच घरबांधणीसाठी विटा घालणे, पायाखोदाई, जमीन करणे, घर शाकारणी आदी कामे काही पै-पाहुणे व मित्र मंडळींद्वारे "एकमेकां साह्य करू ... अवघे धरू सुपंथ" या उक्तीनुसार म्हणजेच ''''पावणेर'''' करून पूर्ण करत होते. त्यामुळे कष्टाची व घाईगडबडीची कामे कमीत कमी वेळेत व नाममात्र खर्चात पूर्ण होत होती. एकमेकांच्या सहकार्यातून मोठे काम चुटकीसरशी तर पूर्ण होत होते. त्याचबरोबर जिव्हाळा निर्माण होऊन नातेसंबंध घट्ट होत होते.

पण अलीकडच्या काही वर्षांत ,दुग्ध व्यवसाय, नानाविध क्षेत्रांंत तरुणाईला उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या संधी, उच्च शिक्षण पूर्ण करून शहरांत गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या, अशा विविध कारणांमुळे ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावला. कुटुंब छोटं असलं तरीही धावपळ आणि व्यापही वाढला. एकत्र येऊन काम करायला वेळ मिळत नाही, एवढी व्यस्तता वाढली. त्यामुळे पाहुणे व मित्रमंडळींच्या नाकदुऱ्या काढत पावणेर घालून काम करीन घेण्यापेक्षा पैसे देऊन काम करून घेण्याकडे कल वाढला. आता तर पावणेरने काम करण्याची प्रथाच ग्रामीण भागातून हद्दपार होतं आहे. त्याचबरोबर नात्यातील आपुलकीत पण दुरावा वाढत आहे.

चौकट ः

असा असतो पावणेर !

दिवसभर सर्वांनी मिळून काम पूर्ण केल्यानंतर त्याच रात्री पिणाऱ्यांसाठी मद्यपानाची खास सोय असते. त्यानंतर कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा झणझणीत तांबडा रस्सा व रक्ती मुंडी, सोबतीला शाळू, नाचणी, मक्याची भाकरी आणि बासमती तांदळाचा भात असा फकड बेत आखला जातो. शाकाहारीसाठी वेगळी सोय असते. यातून दिवसभर केलेल्या कामाचा शिणवटा तर पळतोच, पण नातेसंबंध दृढ होऊन एक वेगळा स्नेहबंध जपला जातो.

....प्रतिक्रिया... " घरबांधणी व शेतीतील जी कामे एकट्या दुकट्याने पूर्ण होत नाहीत. ती कामे ''''पावणेर'''' करून कमी वेळेत झटपट व कमी खर्चात होतात, पण अलीकडे पावणेर करण्याची पध्दत बंद होत आहे.त्यामुळे ''''पावणेर'''' म्हणजे काय हे भावी पिढीला समजून सांगावे लागणार आहे"

---/// जयवंत कदम, आवळी, ता. पन्हाळा