शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे बैठक घेवून तोडगा काढल्याने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ...

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे बैठक घेवून तोडगा काढल्याने पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या पाच वर्षातील जिल्हा परिषद खर्चाचे लेखे अद्ययावत केल्याशिवाय पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे १३३७ कोटी रुपये पडून होते. याबाबत २० जूनला ‘लोकमत’ने वृत्त दिले होते.

पाचही वर्षीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने केलेल्या खर्चाचे सर्व लेखे अद्ययावत करण्यापेक्षा प्रत्येक महिन्याची जमा आणि खर्च अद्ययावत करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. साठ महिन्यांचा जमा-खर्च अद्ययावत केल्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी पीएफमएमएस प्रणालीतून शक्य होणार आहे. यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. व्हीसीच्या माध्यमातून हा पर्याय सर्व जिल्हा परिषदांना कळवण्याचे आदेश मुश्रीफ यांनी दिले. त्यानुसार मंगळवारी दुपारी चार वाजता ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, वित्तचे उपसचिव प्रवीण जैन यांनी सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन त्यांना पर्याय दिला.

पंधराव्या वित्त आयाेगातून निधी खर्च करताना आधीचे पाच वर्षांच्या खर्चाचे सर्व लेखे पूर्ण करण्याचा पीएफएमएस प्रणालीमध्ये संदेश येत होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेले लेख अद्ययावत करण्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध नव्हते. काही कंत्राटी संगणक परिचालक घेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु हे काम लवकर उरकणारे नव्हते. हा निधी वेळेत खर्च झाला नाही तर मिळणाऱ्या प्रोत्साहनात्मक अनुदानावरही पाणी सोडावे लागले असते. मुश्रीफ यांनी कोणत्याही स्थितीमध्ये यातून मार्ग काढा, कोरोना काळात इतका निधी शिल्लक असताना केवळ तांत्रिक अडचणीमुळे तो शिल्लक राहता कामा नये अशा सूचना दिल्या.

२२०६२०२१ कोल लोकमत ०१