शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

पावणेदोन लाख हेक्टरची धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:05 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्'ाचा विचार करता, तब्बल पावणेदोन लाख हेक्टर जमिनीची धूप झाल्याचे मृदा सर्वेक्षण विभागाचे आकडे सांगतात.जिल्'ातील ४ लाख ५ हजार हेक्टर पिकाऊ जमिनीपैकी १ लाख ७२ हजार २७८ हेक्टरवरील जमिनीची धूप झाली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यात धूप झालेल्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. जिल्'ात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १७७२ मिलिमीटर पाऊस पडतो; पण गेल्या दोन वर्षांतही जुलै ते आॅगस्ट या दोनच महिन्यात ही सरासरी पूर्ण होताना दिसत आहे. चार महिन्यांचा पाऊस महिना दोन महिन्यांतच ढगफुटीसारखा पडत असल्याने पाण्याच्या लोंढ्याबरोबर माती वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे.या निसर्गाच्या अवकृपेबरोबरच बेसुमार वृक्षतोड, अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अतिवापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, आदी कारणांमुळे मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीवरचा सुरुवातीचा १0 सेमी जाडीचा थर हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. तथापि त्याच्या जपणुकीकडे दुर्लक्ष केल्याने जमिनीचे धूप होण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.झाडांची मुळे माती धरून ठेवतात; पण अलिकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. डोंगररांगावरच झाडे कमी झाल्याने पडणारा पाऊस उतारावरून सखल भागाकडे वेगाने वाहत आहे. वाहताना सोबत मातीही वाहून जात आहे; त्यामुळेच अतिपाऊस पडणाºया प्रदेशात सुपीक माती जाऊन जमिनी उजाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेताच्या बांधावर छोटी-मोठी झाडे लावली जात होती, जमिनीची धारणक्षमता कमी झाल्याने बांधावरील वृक्षांचीही तोड झाली आहे. आज क्वचितच बांधावर झाडे दिसतात. तसेच रानबांधणी करताना बांधच नांगरून काढण्याचेही प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टरसारख्या मोठ्या यंत्रांनी जमिनीच्या खोलवर नांगरटी केल्या जात असल्याने सुपीक जमिनीचा थर विस्कटला जात आहे.नदीकाठावर प्रमाण जास्तनदीकाठावरील जमिनीची धूप होण्याचे प्रमाण जास्त आहे.बेट आणि गवतामुळे पुराच्या पाण्याचा वेग कितीही असला, तरी नदीचा काठ तुटत नसे. आता मात्र बेट खरवडून काढून टाकले गेले आहेत. गवताची कुरण काढून नदीकाठापर्यंत नांगरट करून उसाची शेती केली जात आहे; त्यामुळे पूर आला, की पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर सुपीक माती वाहून जात आहे.जमिनीचे धूप झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका क्षेत्रकरवीर ५८९0पन्हाळा १४२0७गडहिंग्लज ५६४९राधानगरी ३७८२0कागल ५५११गगनबावडा १0२५0तालुका क्षेत्रशाहूवाडी ३२८२५हातकणंगले ११४२३शिरोळ ५६६0भुदरगड १0७८४आजरा ११३४६चंदगड २0९0३