शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पासार्डे तलावाला यंदा ३२ वर्षांनी पाझर फुटणार

By admin | Updated: May 12, 2016 00:51 IST

काम युद्धपातळीवर : परिसरातील सिंचन, पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार

मच्छिंद्र मगदूम --सांगरूळ -निकृष्ट कामामुळे १९८४ साली फुटलेला पासार्डे येथील पाझर तलाव गेली ३२ वर्षे कोरडाच आहे. मात्र, यंदा प्रशासनाने तलावाच्या दुरुस्तीचे काम वेगाने हाती घेतले असून, काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून यंदाच्या पावसाळ्यात तलावात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील आटलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे. सन १९७२ मध्ये तत्कालीन कृषिराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी शासनाकडून पाझर तलावाची मंजुरी घेतली. प्रत्यक्ष १२ वर्षांनी १९८४ ला तलावाच्या कामाला सुरुवात झाली. एक वर्षात कामही पूर्ण झाले; पण ठेकेदाराने तलावाला दगडी पिचिंग केले नाही. पावसाळ्यात तलाव भरण्यास सुरुवात झाली. मात्र, पिचिंग नसल्याने व निकृष्ट कामामुळे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याआधीच वाहून गेला. या तलावामुळे ५०० एकर जमीन सिंचनाखाली येणार होती; पण तलाव फुटल्याने शेतीला फायदा होण्याअगोदरच शेतीचे नुकसान करून गेला. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या, शेतात गाळ साचला. शेतकरी व प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. येथील शेतकरी ३२ वर्षे पाण्याविना होरपळला आहे.२०१३ साली एक कोटी ९१ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठविला; पण हे काम मंत्रालयात रखडले.याचदरम्यान करवीर तालुक्यातील आमशी गावच्या विमल पुंडलिक पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी पाठपुरावा करून तलावदुरुस्तीस डी.पी.डी.सी.मधून २ कोटी ३० लाखांचे बजेट मंजूर करून घेतले. लगेच कामाला सुरुवातही झाली. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दगडी पिचिंग व सांडव्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून पावसाळ्यात या तलावात पाणी अडविले जाणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे.