शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पासार्डेचा पाझर तलाव भरला

By admin | Updated: July 9, 2016 01:00 IST

३२ वर्षांची प्रतीक्षा : पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार; शेतीसाठी लाभदायक

मच्छिंद्र मगदूम-- सांगरूळ१९८४ साली तयार केलेला पासार्डेचा पाझर तलाव पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला. निकृष्ठ कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात वाहून गेले. यानंतर ३२ वर्षे हा तलाव कोरडाच आहे. ३२ वर्षांनंतर प्रशासनाने यंदा तलावाची दुरुस्ती केली. यानंतर तलाव प्ारिसरात दमदार पाऊस झाल्याने पाझर तलाव तुडुंब भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. पाझर तलाव भरल्याने या परिसरातील आठलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे. यामुळे पुढील उन्हाळ्यात येथील शेतकरी पाण्यामुळे सुखावणार आहे.१९७२ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांनी शासनाकडून पाझर तलावची मंजुरी घेतली. मात्र, काही अडचणीमुळे प्रत्यक्षात १२ वर्षांनी १९८४ ला तलावाच्या कामाला सुरुवात झाली. एका वर्षात कामही पूर्ण झाले; पण ठेकेदाराने तलावाला दगडी पिचिंग केले नाही. निकृष्ठ कामामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याआधीच फूटून वाहून गेला. यामध्ये शेतकऱ्यांची ५00 एकर जमीन सिंचनाखाली येणार होती. तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे व प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. २0१३ साली १ कोटी ९१ लाखांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शासनाकडे पाठवला; पण हे काम मंत्रालयात रखडले. याच दरम्यान आमशीच्या विमल पुंडलिक पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. त्यांनी पाठपुरावा करून तलाव दुरुस्तीसाठी डी. पी. डी. सी. मधून २ कोटी २0 लाखांचे बजेट मंजूर करून घेतले व लगेच कामाला सुरुवात झाली. काम पूर्ण होऊन या पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून ओसंडून वाहू लागला आहेपासार्डे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकऱ्यांच्या आठलेल्या विहिरींना पुन्हा पाझर फुटणार आहे, तसेच पासार्डे गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे.-विमल पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद