शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष स्थापन केल्यास सत्ता काबीज

By admin | Updated: October 10, 2016 01:04 IST

बी. जी. कोळसे-पाटील : मराठा समाजाने प्रस्थापित पक्ष, नेतृत्व झुगारावे

कोल्हापूर : तरुणांनी प्रस्थाापित नेतृत्व व पक्षाला झुगारून ‘मराठा सकल मोर्चा’चे रूपांतर राजकीय पक्षात करून लढा दिल्यास फक्त राज्याचीच नव्हे तर देशाची सत्ता मराठा समाज काबीज करील, असा आशावाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले असता येथील बिंदू चौकातील ’भाकप’च्या कार्यालयात ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, भारताच्या राज्यघटनेच्या कलम १६ (४) प्रमाणे स्वतंत्र आयोग नेमून मराठा समाजाची वस्तुस्थिती मांडता येते. याद्वारे शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाचा झालेला मागासलेपणा सिद्ध करता येतो. यापूर्वी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंत जे आयोग नेमले, त्यांनी ‘ओबीसी’मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, अशी शिफारस केली होती; पण मराठा समाजाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे हे आरक्षण मिळू शकले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे समितीने दिलेला अहवालही परिपूर्ण नसल्यामुळे तो अडकला आहे. कलम १६ (४) प्रमाणे राज्य शासनाने इच्छाशक्ती व्यक्त केल्यास राज्य शासनात तसेच शिक्षणात आरक्षण मिळू शकते. मराठा ही जात सर्वसमावेशक असून तिच्याकडे असणारे नेतृत्वगुण इतर कोणत्याही पक्षात नाहीत असे सांगून माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, मराठा जातीची संख्या हीच खरी ताकद आहे. इतर पक्षांत विखुरलेल्या ३५ टक्के मराठा समाजाला एका छताखाली संघटित करावे. मराठा समाजाने जातीच्या विकासाचा अजेंडा ठरवताना इतर सर्व जातीधर्मातील लहान भावंडांना न दुखावता आपल्या पंखाखाली घ्यावे. मराठ्यांनी इतर सर्व जातीला सत्तेत भागिदारी देऊन, त्यांच्या संख्येच्या प्रमाणात सर्व पदे सर्वांना दिली पाहिजेत. या समाजाने ‘मराठा सकल मोर्चा’चे राजकीय पक्षात रूपांतर केल्यास फक्त राज्याचीच नव्हे तर देशाचीही सत्ता काबीज करता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) राजकीय इच्छाशक्ती नाही कॉँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी दोन्हीही पक्षांच्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आजची ही परिस्थिती उद्भवली आहे, असेही ते म्हणाले.