शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

सकल ब्राह्मण समाजाचाही सहभाग

By admin | Updated: October 9, 2016 01:33 IST

बैठकीत पाठिंब्याचा निर्णय : मोर्चावेळी पाणीवाटप करणार

कोल्हापूर : ‘सकल ब्राह्मण’ या झेंड्याखाली एकत्र आलेल्या कोल्हापुरातील कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण समाजाने शनिवारी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नुसत्या पाठिंब्यावरच न थांबता आवश्यकतेनुसार लागेल तिथे मदत करण्याबरोबरच मोर्चात पाणीवाटप करू, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. बिनखांबी गणेश मंदिराशेजारी मंगलधाम ब्राह्मणसभा करवीर येथे सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र किंकर होते.कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण समाज हा ‘सकल ब्राह्मण’ या झेंड्याखाली एकत्र आला आहे. त्यासह ब्राह्मण समाजाशी संबंधित असणाऱ्या संस्था व संघटनांनी शनिवारी एकत्र येऊन बैठकीत मराठा मोर्चाला पाठिंबा जाहीर केला.अ‍ॅड. राजेंद्र किंकर म्हणाले, या मोर्चात ब्राह्मण समाज बहुसंख्येने सहभागी होणार आहे. सर्व समाजाने पाठिंबा दिला आहेच; परंतु आणखी काहीतरी नियोजन करता येते का, तेही पाहिले जाणार आहे.नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अंबाबाई पुजारी मंडळातर्फे मोर्चातील लोकांना पाण्याची सोय करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी अ‍ॅड. केदार मुनीश्वर, चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, परशुराम नागरी पतसंस्थेचे सचिव द. गो. कानिटकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शाम जोशी, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह धर्मराज पंडित, करवीर निवासिनी ब्राह्मण पुरोहित संघाचे सुहास जोशी, आदींनी पाठिंबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत लिमये, आदी उपस्थित होते.कोल्हापुरातील मंगलधाम ब्राह्मणसभा करवीर येथे शनिवारी झालेल्या सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.